प्रिय रुक्मिणी.
प्रिय रुक्मिणी, येतेस आयुष्यात माझ्या? तर जरा थांब! येण्या आधी वाटेत राधा आणि मीरा ही उभी आहे त्यांच्याशी तुझं हितगुज साध. कारण तु राधाची जागा नाही घेऊ शकत आणि मीराची जागा मी तुला नाही देऊ शकत. आता तु ठरव तुला काय करायचंय ते. पण हा एक मात्र नक्की सांगेन, तुला ह्या दोघींच्या अगदी मधोमध एक अर्धांगिनी नावाची जी सुंदर जागा आहे तिथे तुला राहाव लागले. पण तिथे तुला नाव लौकीक मिळणार नाही किंवा माझ्या नावा सोबत तुझ्या नावाचा उल्लेख ही होणार नाही कारण ते फक्त राधा आणि मीरालाच माहित आहे. बघ मान्य असेल तर हे सगळं सहन करावं लागेल अन्यथा ह्या कान्हाला समजायला तुला जरा वेळ लागेल. मला मान्य आहे तुझ माझ्या आयुष्यातील हक्काचं अस्तित्व, मी ते नाकारलं नाही आणि नाकारतही नाही. पण राधा श्वास तर मीरा अस्तित्व आहे माझं त्यामुळे त्यांना ह्या जन्मी विसरनं शक्य नाही मला. तुला जर माझं व्हायचं असेल ना? तर तु तुझ्या अस्तित्वाचा काही अंशी भाग माझ्यासाठी वाहून दे, तेव्हाच लोक तुला माझी रुक्मिणी म्हणून ओळखतील. पण ते वाटतं तितकं सोपं नाहीये त्यासाठी तुला माझ्या राधाची आणि मीराची खरी कहानी जाणून...