Posts

Showing posts from December, 2021

सांग, साथ देशील का?

Image
(फोनचा आवाज) ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग,  2 ते 3 वेळा फोन लावल्या नंतरही  फोन न उचलल्यावर करण स्वताशीच पुटपुटला. करण : अरे यार फोन तर उचल केव्हाचा फोन करतोय मी! ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग,  कोमल : हॅलो. करण : हुशशशशश, नशीब फोन उचललास,  कुठे आहेस तु? मी केव्हाचा फोन करतोय... कोमल : अरे यार साॅरी साॅरी.. मोबाईल silent मोडवर होता साॅरी...... करण : ते जाऊ दे सोड आता मी काय म्हणतो ते ऐक आपल्या ना उद्या फिरायला जायच आहे. कोमल : उद्या आणि कुठे? आणि अचानक. करण :अचानक नाही ग. कोमल : मग? करण : अग खुप दिवस झाले आपण फिरायला नाही गेलो ना म्हणून म्हटलो चला जाऊयात. तु, मी, रोहित, समीक्षा , दिपक, आणि काजल.  एव्हढे जण आहे बघ..... कोमल : अरे पण अस अचानक आणि  घरी काय सांगू? करण : अग वेडे आपल्या काही मुक्कामी नाही जायचं तिकडे 5/6 तासात येऊन जाऊ. कोमल : बर ठिक आहे. बघते मी मॅनेज होत कि नाही ते. करण : ते बघते बीगते मला नाही माहित  तुल...