सांग, साथ देशील का?
(फोनचा आवाज)
ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग,
2 ते 3 वेळा फोन लावल्या नंतरही फोन न उचलल्यावर करण स्वताशीच पुटपुटला.
करण : अरे यार फोन तर उचल केव्हाचा फोन करतोय मी!
ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग ट्रींग,
कोमल : हॅलो.
करण : हुशशशशश,
नशीब फोन उचललास,
कुठे आहेस तु?
मी केव्हाचा फोन करतोय...
कोमल : अरे यार साॅरी साॅरी..
मोबाईल silent मोडवर होता साॅरी......
करण : ते जाऊ दे सोड आता मी काय म्हणतो ते ऐक आपल्या ना उद्या फिरायला जायच आहे.
कोमल : उद्या आणि कुठे? आणि अचानक.
करण :अचानक नाही ग.
कोमल : मग?
करण : अग खुप दिवस झाले आपण फिरायला नाही गेलो ना म्हणून म्हटलो चला जाऊयात.
तु, मी, रोहित, समीक्षा , दिपक, आणि काजल.
एव्हढे जण आहे बघ.....
कोमल : अरे पण अस अचानक आणि घरी काय सांगू?
करण : अग वेडे आपल्या काही मुक्कामी नाही जायचं तिकडे 5/6 तासात येऊन जाऊ.
कोमल : बर ठिक आहे. बघते मी मॅनेज होत कि नाही ते.
करण : ते बघते बीगते मला नाही माहित तुला यावच लागेल.
कोमल : बर बाबा ठिक आहे पण जरा वेळ देशील का नाही विचार करायला.
करण : बर ठिक आहे पण मी काही कारणं ऐकून नाही घेणार बर का.
कोमल: हो बाबा...
पण कुठे जायच फिरायला ते सांगशील का?
करण : वणीला सप्तश्रृंगी गडावर!
कोमल: अरे ईतक्या लांब.
करण : काही लांब वगैरे नाहीये.
कोमल : हमममममम
करण : बर चल फोन ठेवतो मी, भेटू उद्या
आणि हा उद्या सकाळी आठ वाजता आवरून रहा समीक्षा तुला घ्यायला येईल.
कोमल : बर ठिक आहे बाय.
फोन ठेवल्या नंतर करण नी बाकीच्या मित्रांना फोन करून उद्याच्या प्लॅन बद्दल सांगितल..
आणि सगळे तयार झाले. ( काहीनी नाटके केले पण शेवटी तयार झाले.)
दुसर्या दिवशी सर्व मित्र-मैत्रीण सकाळी 7.30ला नेहमीच्या कट्ट्यावर जमले..
आणि करणला विचारत म्हणाले,
काय रे साल्या अस अचानक कसा काय प्लॅन केला?
करण : तुमच्या मायला तुमच्या एक तर कुठे फिरायला निघत नाही आणि मी प्लॅन केला तर मलाच बोलतात.
मित्र-मैत्रीण : बस का करण, मजाक करतोय आम्ही.
आणि ती कोमल कुठे आहे? आली नाही अजून.
करण : अरे हो,
अगं समीक्षा ऐकना हि घे माझ्या गाडीची चावी आणि कोमल ला घेऊन ये. मी काल तिला सांगितल होत कि तुला समीक्षा घ्यायला येणार आहे तर ती तुझी वाट बघत असेल जा पटकन.
समीक्षा: ठिक आहे जाते, पण पेट्रोल आहेना गाडीत?..
करण: हो मग विषय आहे का आपल्या गाडीत नेहमी पेट्रोल असत.
समीक्षा: हो का मग बर त्या दिवशी रस्त्यावर गाडी ढकलत चालला होता.
मी: तुला कोणी सांगितलं? नक्कीच या दिप्याने सांगितल असेल याच्या पोटात ना काहीच राहत नाही साला चू$$$$$
समीक्षा: तो कशाला सांगेल, त्या दिवशी मी आणि मम्मी सोबत भाजी घ्यायला चाललो होतो तेव्हा तु मला दिसला होता.
सर्व मित्र-मैत्रीणी : हाहाहाहाहाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा .
करण: गप बसा साल्यानो आणि तु ग जास्त डोक नको लावू जाय पटकन.
समीक्षा: ठिक आहे बाबा चिडू नको.
करण : हममम नीट जाय आणि हा माझ्या गाडीला ब्रेक आहे बर का, नाही ते तु पायाचा उपयोग करशील म्हणून म्हटलो.
सर्वजण : हाहाहाहा हाहाहाहा हाहाहाहा
समीक्षा: गप माकड्या हसु नको नाहीतर मी जाणार नाही.
करण : बर नाही हसत, जाय आता.
समीक्षा: हममममम
समीक्षा गेल्यानंतर सारेजण एकमेकांशी गप्पा मारत बसले.
दिपक: काय रे करण एव्हढ्या लांबचा स्पाॅट पाहिला जरा जवळचा स्पाॅट बघायचा ना? म्हणजे कस लवकर येता आल असत घरी.
करण: गप जाड्या तुला सांगितलं तर म्हणतो आपण काय तुम्ही म्हणाल तिकडे येऊ. मग आता कशाला नखरे करतोय.
दिपक : नाहीरे ते आपल सहजच बोललो मी.
करण: हा गप आता.
( ईकडे सर्वजण गप्पा मारण्यात गुंग झाले होते तर )
तिकडे,
समीक्षा कोमलच्या घरी पोहोचली होती.
कोमलचे वडील अंगणात झाडांना पाणी देत होते तेव्हा ते समीक्षाला पाहून म्हणाले,
कोमलचे वडील : काय गं समीक्षा आज कशी काय वाट चुकली आणि नवीन गाडी घेतली की काय?
समीक्षा: नाही ओ काका ते कोमलला घ्यायला आले होते मी आणि ही माझ्या मैत्रीणीची गाडी आहे माझी नाही.
कुठे आहे कोमल?
कोमलचे वडील : घरात आहे ती,
थांब मी तिला आवाज देतो.
कोमल ये कोमल.
अग बाहेर ये जरा ती समीक्षा आली आहे बघ.
कोमल : हो बाबा आलेच.
(बाबांचा आवाज ऐकत कोमल बाहेर आली.)
कोमल: हाय कधी आलीस आणि आज चक्क गाडी ?
समीक्षा: हो मग राणीसाहेबांना गाडीवर घेऊन या अशी फरमाईश आहे.( मस्करीत)
कोमल: गप वेडे.
अस म्हणत कोमलने समीक्षावर डोळे वटारले. (कारण बाबा जवळ उभे होते.)
चला बाबा निघते मी काॅलेजला.
अस म्हणत कोमल आणि समीक्षा घराकडून निघाले.
ईकडे सर्व मित्र दोघीची वाट बघत होते.
कट्ट्यावर पोहचता पोहचता दोघींना 15/20 मिनिट लागले.
त्यांना पाहून सर्व जण म्हणायला लागले,
किती उशीर? 8 चा टाईम सांगितला होताना, आता किती वाजले आहे बघा तर?
कोमल -समीक्षा: अरे यार साॅरी साॅरी.
सर्वजण : आता बसा गाडीवर, निघूयात.
अस म्हणत सर्वानी आपापल्या गाड्या काढल्या आणि वणीच्या दिशेने जायला निघाले.
(निसर्गाच्या कुशीत वसलेल वणी गाव आणि त्यात उंच डोंगरावर साडेतीन शक्ती पिठापैकी एक असलेल सप्तश्रृंगी देवीच मंदीर सगळ कस विलोभनीय आणि मनाला एक वेगळा आनंद देणार ठिकाण.)
हिवाळ्याचा महिना असल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा होता. प्रत्येकजण थंडीने कुडकुडत होते पण सर्वजण प्रवासाचा आनंदही घेत होते.
पण थोड्या दुरवर गेल्यानंतर अचानक काजल ओरडली...
काजल : ये थांबा थांबा थांबाथांबा
सर्वजण: काय झाल आता?
काजल : अरे यार लय थंडी वाजत आहे चलाना समोरच्या टपरीवर मस्त गरमा गरम चहा पिऊयात.
रोहित : नको नको नको आधीच उशीर झालाय परत ईथे टाईम पास होईल नको.
काजल : प्लिजना यार चला ना पाच मिनिटात चहा पिऊन लगेच निघू, प्लिज.
काजलच बारीक तोंड पाहून सर्वजण म्हणाले बर ठिक आहे पण बिल तु भरायच बर का?
काजल : हो पण पैसे द्या सगळ्यानी मग भरते की त्यात काय एवढ. ( हाहाहाहाह हाहाहा हाहा)
दिपक : हा जास्त हसू नको. जा तु आणि रोहित आम्हाला चहा घेऊन या. ऐ रोहित जारे तिच्या सोबत.
दिपकच ऐकत काजल आणि रोहित चहा आणायला गेले.
चहावाले काका: बोला बेटा.
काजल : काका 6 कप चहा द्या आणि सोबत बिस्किट पुडा. रोहित तु काही घेशील.
रोहित : नाही नाही नको मला .
काजल : बर ठिक , काका ६ चहा आणि एक बिस्किट पुडा.
चहावाले काका: ठिक आहे बेटा, बसा तुम्ही मी चहा आणतो.
काजल : ठिक आहे काका पण जरा लवकर.
चहावाले काका: हो बेटा फक्त पाच मिनिट.
( पाच मिनिटानी)
हे घ्या पोरानो गरमा गरम चहा आणि बेटा हा तुझा बिस्किट पुडा आणि चहा कसा आहे सांगा बर का.
सर्वजण : हो काका.
चहा पिऊन झाल्यावर सर्वजण : काका चहा एकदम झकास होता आता कुठे प्रवासाला मज्जा येईल बघा.
काजल : काका किती पैसे झाले?
चहावाले काका : 60 रूपये.
काजल : हे घ्या.
चहा पिऊन झाल्यावर सर्वजण गाडीच्या दिशेने निघाले.
करण : दिप्या ऐकना भावा
दिपक : अरे तु त्या रोहितच्या गाडीवर बसतो का? मला काजल सोबत बोलायच आहे.
दिपक :काय बोलायच आहे ?
करण : अरे सांगतो ना काम झाल्यावर, प्लिज बसना रोहितच्या गाडीवर.
दिपक : ठिक आहे.
करण : थँक्यू भावा.
ये काजल.
काजल : काय रे?
करण : अग ऐकना
काजल : बोलना..
करण : अग जरा बोलायच होत तुझ्याशी
काजल : मग बोलना!
करण : अग सर्वजण आहे. ईथे नको..
काजल : मग कुठे जाऊन बोलायच?
करण : तु बसना माझ्या गाडीवर तुला सांगतो मी पुढे गेल्यावर.
काजल : अरे पण काय बोलायच आहे आणि दिपक कुठे बसेल? तो परत माझ्या नावाने चिडचिड करेल.
करण : अग यार बसना तु, मी आहे ना. मी त्याला आधीच सांगितल आहे तु रोहितच्या गाडीवर बस मला काजल कडे काम आहे. तो नाही काही बोलणार.
काजल : बर ठिक आहे.
ह्या दोघांना अस बाजूला उभ राहून बोलताना पाहून सर्वजण म्हणाले : अरे काय बोलू राहिले चला ना आधीच खुप उशीर झालाय.
करण आणि काजल : हो आलो आलो.
अस म्हणत करण नी गाडी काढली आणि काजलला गाडीवर बसवून वणीच्या दिशेने निघाला. सर्वजण एकमेकांच्या पुढे मागे एक करत करत सुसाट निघाले. हिवाळ्याचे दिवस आणि त्यात कमालीचा गारवा आणि सोबत हिरवेगार डोंगर प्रवासात वेगळाच रंग भरत होते.
काजल : करण बोलना रे काय सांगणार होता तु?
करण : पहिले प्राॅमिस कर तु कुणालाही काही सांगणार नाही.
काजल : अरे विश्वास ठेव नाही सांगणार कुणाला.
करण : हो मग ऐक,
अग मला ना आज एक सरप्राईज द्यायच आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे.
काजल : हो का ( आश्चर्याने)
करण : हो!
काजलः काय सरप्राईज आहे सांग की!
करण : एक काम कर माझ्या बॅग मधल्या पहिल्या कप्प्यात एक पत्र लिहील आहे ते वाच मग कळेल तुला मला काय म्हणायच आहे.
काजल : ठिक आहे.
(बॅग मधून पत्र काढल्या नंतर )
काजल : वाचून का?
करण : हो वाच पण वाचताना जरा मोठ्यानी वाच मला ऐकू यायला पाहिजे.
काजल पत्र वाचायला सुरुवात करते.
Dear______,
काय रे करण तु Dear तर लिहील पण त्या पुढे नाव नाही लिहील , नाव लिहायच विसरला का?
करण : ते नाव सांगतो मी तुला नंतर पण तु पुढे पत्र वाच.
काजल : हो वाचते
Dear___...
खर तर आज मनातल्या खुप सार्या गोष्टी तुला सांगायच्या आहे पण कुठून आणि कशी सुरुवात करू हे कळत नाहिये. _________________________
________________________________________________
जस जशी काजल पत्र वाचत होती तस तसे तिच्या चेहर्यावरील हावभाव बदलत होते जस काय ते पत्र करणनी काजलसाठी लिहल होत ह्या भावात ती आनंदाने बहरून गेली होती.
काजल : करण काय पत्र लिहील आहे (आनंदाने)
खरच मानल राव तुला.
माहित आहे तु छान बोलतो, तुझ्या बोलण्यात गोडवा आहे पण त्याहून छान तुझ लिखाण आहे. जणू त्या पत्रातील तुझ्या सर्व भावना माझ्यासाठीच आहे अस वाटल वाचताना.
करण : हममममम, मग करशील ना मला मदत त्या व्यक्तीला सरप्राईज द्यायला.
कोमल : हो करेल ना.
तेवढ्यात काजलला समीक्षाचा फोन आला.
समीक्षा: अग कुठे आहात तुम्ही? आम्ही वाट पाहतोय तुमची कुठे राहिलात.
काजल : अग हो आलोच, तुम्ही व्हा पुढे.
जवळपास एक तासाचा रस्ता त्यांनी पार करत सप्तशृंगी गड गाठला.
दिपक : काय रे करण काय करत होते मागे.
करण :काही नाही रे ही काजल घाबरत होती मी जोरात गाडी चालवल्यावर म्हणुन जरा हळूहळू आलो. ( अस म्हणत करण नी विषय टाळला) चला ना देवीच दर्शन घेऊन येऊयात.
सर्वजण : ठिक आहे ( अस म्हणता सर्वजण देवीच्या मंदीरा कडे निघाले.)
आमच्या सारखेच किंवा त्याहून ही दूरवरून भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या पायथ्याशी प्रसाद व देवीला लागणाऱ्या साहित्याचे(खण - नारळ , फुल , कुंकू)दुकान सजलेले होते. सगळ कस मनमोहक होत आणि उंचावर वसलेल्या सप्तशृंगी देवीच दर्शन घेण्यासाठी जवळपास ४७२/500 पायर्या पायदळी तुडवायच्या होत्या.
अन सर्वजण ढापा टाकत,थांबत , बसत देवीच्या मंदीरा जवळ पोहचले.
मंदिरा जवळ पोहचल्यावर सर्वजणांनी एकच घोषणा केली "बोला सप्तशृंगी माते की जय"
त्यामुळे मंदिरातील परिसर दुमदुमून निघाला अन सार वातावरण भक्तीमय झाल. देवीच मनमोहक रूप डोळ्यात साठवण्या सारख होत सर्व भाविक देवीकडे आपल्या इच्छा- आकांक्षा व केलेला नवस फेडण्यासाठी आले होते. तर कुणी इच्छा पुर्ण व्हावी यासाठी आलेले होते. त्यातलाच एक करण देवीकडे पाहून त्याची इच्छा व्यक्त करत होता. ( त्याच्या मनात नेमक काय चालू होत हे त्याला अन काजललाच माहित होत.)
देवीच्या पायावर माथा टेकून करण आणि बाकीचे सर्वजण मंदीरा बाहेर आले.
उंचावरून खालचा सर्व परिसर दिसत होता.
सर्वजण एकमेकांचे फोटो काढण्यात व्यस्त होते तर इकडे काजल करणला खुणावत होती.
तेवढ्यात....
रोहित : चला यार आता मी लय दमोलय आपण पटकन खाली उतरत काही तरी खाऊयात मला खुप भुक लागली आहे.
समीक्षा : हो यार चला पटकन मलाही खुप भुक लागली आहे.
(म्हणून सर्वजण खाली उतरू लागले)
एक एक करत सर्वजण जेवढ्या पायर्या चढले होते तेवढ्याच पायर्या पुन्हा उतरू लागले. पायथ्याजवळ आल्यावर तिथल्याच लगतच्या हाॅटेल मधे सर्वजण बसले अन प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या आवडीची डीश मागवली.
दिपक : यार करण भारी वाटल बरा का देवीच दर्शन घेऊन.
करण : बघ तर उगाचच तु नाटक करत होता.
कोमल : खरच करण भारी वाटल आज. अन आज मी नसते आले तर काही तरी मिस केल असत अस वाटतय.
समीक्षा : बस बस ऐवढ पण चण्याच्या झाडावर चढवू नका त्याला अजून बरच फिरायच आहे आपल्याला.
सर्वजण हसायला लागले.
( हाहाहाहाह हाहाहाहाह हाहाहाहाह)
करण : गप शाहणे जास्त नको बोलू तु.
काजल : नाही करण पण खरच छान वाटल ईकडे येऊन.
करण : हममममम , चला आता झाल जेवण निघूयात जरा बाकीचा परिसर बघूयात आणि हा आपल्याला त्या शितकड्याकडे पण जायच आहे.
कोमल : हो चला चला बघूयात मी आईकडून एकदा ऐकल होत शितकड्या बद्दल. आज प्रत्यक्षात बघूयात.
म्हणून सर्वजण शितकड्याच्या दिशेने निघाले.
शितकड्याच्या दिशेने जाताना वाटेत एक तळ लागत तिथे सर्वजणानी हातपाय धुतले आणि पुढे निघाले. शितकड्या जवळ पोहचल्यावर तिथे बरेच माकडे होते म्हणून कुणी पुढे जात नव्हत पण माकडाना हुसकावून लावल्यानंतर वाट मोकळी झाली. पुराणातील कथे नुसार इथून एका बाईने नवस पुर्ण झाल्यावर तो पुर्ण करण्यासाठी 12000 फुट खोल दरी मध्ये बैलगाडी समवेत गेली होती तेव्हा देवी सप्तशृंगी ने तिच्या भक्ताला बैलगाडी समवेत वर काढल्याची आख्यायिका आहे. खाली खोल दरीत डोकावून पाहिल्यावर सर्वांचे डोळे गरगर करायला लागले म्हणून कुणीही पुढे गेल नाही. शितकड्याच दर्शन घेऊन सर्वजण पुन्हा तळ्याच्या दिशेन परतीच्या मार्गावर निघाले.
एकडून करण ने काजलला पुन्हा खुनावले.
ते पाहून समीक्षा उत्तरली.
समीक्षा : काय चाल आहे रे तुमच दोघांच, मगाच पासून बघतेय मी काय ते स्पष्ट तरी बोला म्हणजे आम्हाला कळेल तरी.
काजल : काही नाही ग ते आपल असच.
दिपक : काही तरी लपवताय तुम्ही दोघे. मी निघाल्यापासून बघतोय.
कोमल : हममममम दाल मे कुछ काला लगता है?
करण : रोहित तुझ काही बोलायच राहिल असेल तर तु पण बोलून घे. नाही सगळे जण बोलताय तर तु पण बोलून घे तु कशाला मागे राहतो.
रोहित : मग सांग की काय चाललंय आहे तुमच. काही पर्सनल आहे का तस सांग आम्ही नाही विचारत मग.
(सर्वजण विचारायला लागल्यावर करण स्वताच्या मनाशी बोलू लागला : करण हाच तो क्षण आहे अस समजून देऊन टाक सर्वाना सरप्राईज.)
करण : नाही रे तस काही पण ऐकाना सर्वानी, एक सरप्राईज द्यायच आहे तुम्हा सर्वांना.
सर्वजण: काय सरप्राईज आहे? ( आश्चर्याने)
करण : आधी त्या तळ्याजवळ तर चला मग सांगतो.
सर्वजणाना सरप्राईजची उत्सुकता लागली म्हणून सर्वजण तळ्याजवळ जमले.
करण : काजल इकडे येना.
काजल : हा बोल.
करण : हे घे रूमाल आणि सर्वाच्या डोळ्यावर बांध.
दिपक : करण काय नाटक आहे हे आता.
करण : गप्प बसना भाई तु. ये काजल बांधना तु रूमाल सर्वाच्या डोळ्यावर.
करणच ऐकत काजल नी सर्वाच्या डोळ्यावर रूमाल बांधला.
करण : काजल इकड ये.
काजल : आता काय अजून?
करण : थांब तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे.
( काजलच्या कानात सांगत करण म्हणाला तु पत्र वाचल हो पण ते कोणासाठी आहे हे तुला माहित नाही म्हणून तुला पण सरप्राईज.)
अस म्हणत करण नी काजलच्या डोळ्यावर रूमाल बांधला.
आता काजलच्या डोळ्यावर रूमाल बांल्यावर तिलाही उत्सुकता लागली.
करण : ऐकाना मित्रानो मी आधी लिहीलेल पत्र वाचतो मग तुम्हाला त्या सरप्राईजची हळूहळू कल्पना येईल.
करण पत्र वाचायला सुरुवात करतो.
Dear Sweetheart,
खर तर आज मनातल्या खुप सार्या गोष्टी तुला सांगायच्या आहे पण कुठून आणि कशी सुरुवात करू हे कळत नाहीये पण आज सांगूनच टाकतो कारण आज दिवसही चांगला आहे आणि सोबत देवीचा आशिर्वाद ही, जसा हा क्षण विधिलिखित असावा.
तुला आठवतय? अरे मी पण ना तुला आठवेल तरी कस, सर्व स्वप्न तर मीच बघितले आहे तुझ्यात. तुला पहिल्यांदा पाहिल ना तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो जस "कुछ कुछ होता है " मध्ये काजोलला पाहून शाहरुख खानला झाल होत अगदी तसच. मी तेव्हाच ठरवल होत की प्रेम करेल तर फक्त अन फक्त तुझ्यावरच आणि तुलाच माझी प्रेयसी बनवेल.
अन त्यासाठी मी देवीला सांगितल होत की मी माझ्या प्रेमाला तुझ्या दर्शनला घेऊन येईल अन तुझ्या आशिर्वादनेच तिच्या समोर माझ प्रेम व्यक्त करेल आणि हा तु हो बोलल्यावर आपल्या जोडीने देवीच्या दर्शनाला यायच आहे बरका अन मला माझ्या देवीवर भरवसा आहे की तु माझ प्रेम नाकारणार नाही.
अन हो खरतर मी तुझ्या सोबत सावली सारखा असतो पण तुला कधी जाणवून दिल नाही पण आज त्याच सावलीची तुला जाणिव करून द्यायची आहे कारण तु कितीही उन्हात असली तरीही मी तुझ्या सोबत कायम सावली सारखा उभा राहिल. तुझ्या हसण्याच कारण अन तुझ्यासोबत कायम असण्याच एक कारण मला व्हायच आहे. कारण जन्म मरणाच्या ह्या चक्रा मधे मला तुझ्या सोबत जगण्याचे प्रत्येक स्वप्न शेवटच्या श्वासापर्यंत जगायचे आहे.
जास्त व्यक्त नाही होता येणार मला पण येवढयात तु समजून घेशील अशी मी आशा करतो.
सांग साथ देशील का?
माझ्या हातात हात देऊनी होकारार्थी,
उत्तर कळवशील का?
जस उन्हात मी तुझी सावली बनतो,
तशीच तुही माझी सावली बनशील का?
जपेल मी तुला बाहुली सारख,
पण तु माझी बार्बी डाॅल होशील का?
केलाय हात पुढे प्रेमाचा
सांग साथ तु देशील का?
नको कुणाच्या प्रेमाची गरज,
तु माझी प्रेयसी होशील का?
हात हाता देऊनी विश्वासाचा
साथ तु मला देशील का?
साथ तु मला देशील का?
तुझाच अन तुझ्यासाठीच वेडा
तुझा करण..
पत्राचा शेवट करत करण नी खिशातून एक अंगठी काढली आणि शर्ट च्या आत लपवलेल लाल गुलाब काढल आणि काजल, समीक्ष आणि कोमल यांच्या समोर जाऊन गुढघ्यावर बसला.
(काजलला मनोमनी वाटत होत कि हे सार काही माझ्यासाठीच आहे पण डोळ्यावर रूमाल असल्यामुळेच तिच्या ह्रदयाची धडधड वाढली होती तिने finger cross केले होते.
तर ईकडे समीक्षाही विचारात होती अन कोमलसाठी हे सार नवीनच होत.
अन ईकडे दिपक आणि रोहित ही विचारात पडले की साल्यानी आपल्याला काहीच सांगितल नाही त्याला कुणी तरी आवडतय ते.)
करण: आता सर्वानी डोळ्यावरील रूमाल काढा.
करणच ऐकत सर्वानी डोळ्यावरील रूमाल काढला. अन जसा रूमाल काढला ते पाहून सर्वजण आश्चर्य चकीत झाले.
करण ; आय लव्ह यु कोमल,
खरच खुप प्रेम करतो मी तुझ्यावर.
करण नी कोमलला अनपेक्षित रित्या प्रपोज केल्यामुळे जरा गडबडली अन बाजूला जाऊन उभी राहिली.
इकडे काजलची अनपेक्षित रित्या निराशा झाली.
कोमलच अस रागात बाजूला जाऊन उभ राहन करणसाठी अनपेक्षित होत.
करण : ऐ काजल-समीक्ष, दिपक-रोहित सांगाना यार तिला खरच खुप प्रेम करतो मी तिच्यावर.
प्लिज मनवा ना तिला.
करणची तळमळ पाहून सर्वजण कोमलला समजवायला गेले.
सर्वजण : हे बघ कोमल, करण खुप चांगला मुलगा आहे आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ओळखतो त्याला तेही अगदी जवळून. तु अस शांत राहिली तर कस होईल काहीतरी बोल मान्य कर त्याच्या प्रेमाला.
कोमल : अग कस समजावू तुम्हाला?
आवडतो तो मला, अगदी पहिल्यापासून त्याच बोलण, वागण, लिखाण अगदी साऱ्यांच्या प्रेमात पडले मी. पण काही गोष्टीं पुर्णत्वास नाही गेल्या तर त्याचा त्रास होतो तसच आमच नातं पुर्णत्वास जाणार नाही कारण जात नावाच ग्रहण त्यासाठी कारणीभूत ठरेल आणि याचा त्रास शेवटी दोघांनाच होईल खूप, म्हणून मी घाबरते पुढे पाऊल टाकायला.
कोमलच बोलण ऐकून सर्वजण उत्तरले.
अग हो कोमल बरोबर आहे तुझ म्हणण पण काढू की आपण त्यातून काहीतरी मार्ग आणि तु अस म्हणत राहिल तर कस होईल. तिकडे बघ करणनी कस बारीक तोंड केलय आता तुच जा आणि तुच तुझ्या तोंडनी काय आहे ते सांग.
अस म्हणत सर्वजणानी कोमलला मनवल आणि करणला बोलवल.
करण कोमल समोर येता नजर चोरू लागला जस काय त्याने चूकीच काम केल होत.
कोमल : करण
करण : हा बोलना.
कोमल : इकडे बघ माझ्याकडे.
करण : हा ( करण कोमल कडे पाहू लागला)
कोमल : मी जे काही सांगेल ते तुला मान्य असेल का?
करण : हो मान्य असेल.
कोमल : मग डोळे बंद कर.
करण नी कोमलच ऐकत डोळे बंद केले पण त्या मनात विचारांचा काहूर माजला होता आता त्याला जी आशा होती ती निराशात बदलायला लागली.
करण नी डोळे बंद केल्यानंतर कोमल नी जे केल ते पाहून सर्वजण चकीत झाले.
कोमल : करण डोळे उघड.
करण डोळे उघडताच थबकला, कारण कोमलला समोर गुडघ्यावर बसून, एक विश्वासाचा हात पुढे केलेल पाहन अनपेक्षित होत.
कोमल : सांग करण देशील का? आयुष्यभर.
करण : कोमलचा हात हाता घेऊन करण नी कोमलला उठवल आणि तिच्या हाता अंगठी घालत म्हणाला " हो देईल साथ तुला आयुष्यभर फक्त हाच विश्वास कायम असू दे. प्रेमाने जोडलेल आपल नातं आबादीत होऊ दे.
अस म्हणत करण नी कोमलला मिठीत घेतल.
तेवढ्यात दिपक हसत उत्तरला
दिपक : थोड भान राहू द्या, आम्ही आहे इथे अजून.
दिपकच बोलन ऐकून कोमल खूप लाजली.
अन सगळे हसायला लागले कारण तो क्षण सगळ्यांसाठी अनपेक्षित अन आनंददायी होता. कारण एक नवीन नात्याला बहार आला होता.
आणि तो क्षण चित्रित करण्यासाठी रोहित नी शेजारून जाणाऱ्या फोटोग्राफरला फोटो काढण्यासाठी हाक मारली.
रोहित : दादा ओ दादा
फोटोग्राफर : हा बोला?
रोहित :आमचा एक ग्रुप फोटो काढाना.
फोटोग्राफर : हो हो , ईथे उभे रहा सर्वांनी म्हणजे कस पाठीमागील देवीच मंदीर ही येईल फोटोत.
फोटोग्राफरच ऐकत सर्वजण उभे राहिले आणि ह्या नवीन जोडप्याला अगदी मधोमध उभ केल कारण जेव्हा केव्हा फोटो पाहू तेव्हा ह्या क्षणाची आठवण यावी ह्या उदेशाने.
फोटोग्राफर :चला हसा सगळ्यानी.
फोटोग्राफरच ऐकत सर्व हसले आणि एक आठवण म्हणून कायमचे फोटोत कैद झाले.
लेखक
करण बेंडकुळे.©तारंग.
amazing mind blowing yaar so beautiful
ReplyDelete