निळावंती.

 सगळेजण विचारतात

मला माझ्या लिखाना बद्दल.

कुणासाठी लिहीतो,

तिच्या नावा सोबत तुझ दुःख सांग तर.

पण सांगण्या सारख नाही, दुःख अन तिच नाव.

जस निळावंती मधला तिचा भाव.

मी वाचत गेलो तिला जणू ती आहे तो ग्रंथ.

मला वाटलं मी तिला वाचून होईल श्रीमंत.

जस जस मी तिला वाचत गेलो.

तिच्या हावभावची भाषा मी जाणत गेलो.

पण कुठे शिकलो नव्हतो मी तिची भाषा.

मला सार कळत गेलं, कारण मनी होती एक आशा.

मी हळूहळू तिच्यासाठी वेडा होत गेलो.

जणू ती गुप्त धन, अन‌ मी तिचा लालची झालो.

पण मी विसरलो होतो ती आहे निळावंती ग्रंथ.

तिला वाचताना झाली माझ्या श्वासाची गती संथ.

नाही सांगू शकत तिच्या बद्दल याची मला खंत.

परत विचारू नका ह्या संताचा कोणता पंथ.©तारंग.




Comments

Popular posts from this blog

अंश आणि वृंदा The Death Before Born...

मला सोडून नाही जाणार ना तु?