मला सोडून नाही जाणार ना तु?


 

कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर करण नी पाठीवरची बॅग रागात फेकली आणि एखाद्या लहान मुला सारखा सोफ्यावर आडवा झाला. ते पाहून आई चिडली आणि करणला ओरडायला लागली पण करण नी ते दुर्लक्ष केल आणि निपचित पडून राहिला. खरंतर आज करणच्या चेहऱ्यावरील शांतता खूप काही सांगत होती. करणचे दिवसेंदिवस बदलत जाणारे हावभाव आईच्या चिंतेचे कारण बनत चालले आहे.


आई : काय रे काय झालं आज?

करण: काही नाही ( रागाच्या स्वरात)

आई : काही नाही झालं मग बॅग का फेकली.

करण : काही नाही झालं आणि मला वेड लागलंय म्हणून बॅग फेकली मी. बसं ह्या पुढे मला काही विचारू नको अस म्हणत करण नी आईच बोलणं टाळलं आणि रागारागात बाथरूम मध्ये गेला पण बाथरूम मध्ये गेल्यावर तो रडत स्वतःशीच बडबडायला लागला.

यार करण काय चुकतं माझं, दरवेळेस जो येतो माझ्या भावनांशी खेळतो आणि निघून जातो, माझा कुणीच का विचार करत नाही. मी प्रत्येक नातं विश्वासाने आणि प्रेमाने जोडत आलोय पण सरते शेवटी का म्हणून माझ्या वाटेला इतका त्रास यावा? माझा चांगुलपणा ह्या साऱ्याला कारणीभूत आहे का? काय करू कळत नाहीये मला. हे देवा नको रे इतका अंत पाहून माझ्या सहनशीलतेचा, बसं झालं आता थांबव हे सारं, मला आता सहन नाही होत.


जवळपास अर्धा तास बाथरूम मध्ये रडून झाल्यावर करण बाहेर आला पण करणंच्या चेहऱ्यावरील शांतता तशीच होती.


आई : काय झालं करण सांगशील का मला?

करण : काही‌ नाही गं‌ आई.

आई : घे मग माझी शपथ आणि सांग काही नाही झालं ते.

करण हसण्याचा सोंग आणत म्हणाला.

करण : तुझ तर काही पण असतं, ते शपथ सोड आणि सांग काय केलं आहे खायला.

आई : भरलेली भेंडी केली आहे आणि हा आज काका आले होते घरी त्यांनी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे हा बघ तिचा फोटो, कशी आहे?

करण : छान आहे पण काय शिक्षण झालं आहे तिचं?

असे नाना प्रकारचे प्रश्न करत करण अचानकच शांत झाला आणि बेडरूम मध्ये जाऊन विचार करत बसला.

यार कालचं तर आपण काव्याला वचन दिलं होतं कि तुला एकट टाकणार नाही. तुला तुझ्या ह्या प्राॅब्लेम मधून लवकर बाहेर काढले. जर माझं उद्या लग्न जमलं तर काव्याकडे लक्ष कोण देणार? ती परत एकटी पडून जाईल. नाही करणं तु अस नाही एकट सोडून जाऊ शकत तिला. तुला चांगलं माहीत आहे एकटेपणा किती खायला उठतो ते. तुझ्या सोबत जे झालं तेच तिच्या सोबत नाही व्हायला पाहिजे.

ह्या विचाराने करणं खूप भावूक झाला आणि त्याने काव्याला मेसेज केला.


करण : काव्या लय काळजी लागून राहिली गं तुझी.

काव्या : हो का!

करण : हो यार इतकी काळजी वाटते ना की तुला कधीच एकट सोडणार नाही. तुझे खुप लाड करेल आणि तुला कधीच रडू देणार नाही.

काव्या : एवढ पण नको नाहीतर मी लाडावून जायची.

करण : अगं खरंच ना आता तुझाच विचार चालू होता डोक्यात, जर माझं लग्न झालं तर तु एकटी पडून जाशील आणि मला ते नकोय. त्यामुळे आताना माझी लग्नाची इच्छा पण मरत चालली आहे.

काव्या : करणं काही वेडापणा करू नको, आलं चांगल स्थळं तर हो म्हणं, माझं काही नाही मी राहिल एकटी.

करण: तेच नकोय यार मला.

काव्या : तु वेड्यासारखं करू नको मी राहिल एकटी, थोडा त्रास होईल पण ठिक आहेना.

करण: काव्या मी नाही सोडणार तुला एकट, तु माझ्या जवळ हवी आहे मला.

काव्या: हो करण पण तुझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला तु पहिले प्राधान्य दे. माझ्या मुळे नको तुझ्या आयुष्यात काही प्राॅब्लेम.

करण: काव्या नाही गं होणार प्राॅब्लेम आणि आपण नेहमी सोबत राहणार आहोत ना?

काव्या : हो राहणार आहोत पण नंतर तुच माझ्या पासून दूर जा हं, कारण माझ्या मुळे खरंच नकोय तुझ्या आयुष्यात काही प्राॅब्लेम.

करण: काव्या नको ना गं मला रडायला लावू तु , खरंच त्रास होतोय मला खूप. हे सोडून जायची गोष्ट नको ना करू.

काव्या : हो करणं नाही सोडून जात पण एक वचन दे मला की चांगल स्थळं आलं तर तु हो म्हणशील आणि लग्नाला तयार होशील.

करण : हो वचन देतो तुला पण मला नको सोडून जाऊ यार.

काव्या : नाही सोडून जात मी.

करण : काव्या तुला माहित आहे ना मी किती प्रेम करतो तुझ्यावर.

काव्या : माहित आहे करण.

करण: मला माहीत नाही तुझं माझ्यावर प्रेम आहे कि नाही पण मी तुझ्यावर खुप प्रेम करतो आणि मला तुला नेहमी आनंदात बघायचं आहे त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे.

काव्या : हो करण..


आणि दोन्ही बाजूला शांतता पसरली.

ह्या नात्यांत करणंला निस्वार्थ पणे मैत्री आणि प्रेम टिकवायचं आहे. तर काव्याला करणचं अस्तित्व. पण ह्या द्वंद्वात करणला होणारा त्रास आणि त्याच्या मैत्रीला कुठेतरी आयुष्यभर सोबत न राहण्याचा शाप लागत चाललायं हे मात्र खरं. पण कुठलं नातं का आयुष्यभर टिकतं नाही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू पर्यंत दुसऱ्या नात्याचा जन्म होतो आणि तो प्रश्न नेहमी अनुत्तरित राहतो बरोबर ना करण. ©तारंग.






Comments

Popular posts from this blog

अंश आणि वृंदा The Death Before Born...

निळावंती.