अंश आणि वृंदा The Death Before Born...
प्रिय आई-बाबा, कसे आहात तुम्ही? आम्ही अंश आणि वृंदा बोलतोय. ओळखलं ना? नाही आम्हाला वाटलं एव्हाना विसरले असालं. अंश नाहीच म्हणत होता पण आई तुझी वृंदा तुझ्यावरच गेली आहे, अगदी तुझ्यासारखीच हट्टी..! आज आम्हा दोघांना तुमच्याकडून राहीलेल्या प्रश्नांचे उत्तरे हवी आहे. द्याल ना उत्तर? ब्रम्ह बाबाकडून आम्ही काही मिनिटांचा अवधी घेऊन आलोय. यम काका नव्हतेच देत अनुमती आम्हाला तुमच्याशी बोलण्याची, पण सटवी आईच्या शब्दा खातर जुळून आलाय हा योग. बाबा तुम्हीच दिला होता ना तुमच्या संकल्पनेतून आम्हा दोघांना जन्म. "अंश आणि वृंदा" तेव्हा आई पण किती आनंदी होती आम्हा दोघांना तिच्या गर्भातून जन्म द्यायला. त्यामुळे आम्ही इकडे दोघेही सतत भांडायचो कि कोण पहिले वसुंधरेवर जाईल. अंश आईचा लाडका, तर वृंदा बाबाची लाडकी होणार होती. एक छान कुटुंबाची संकल्पना बाबा नेहमी तुमच्या विचारातून झळकायची आणि तुमच्या विचारांवर आई डोळे झाकून चालायची. ते पाहून आम्ही दोघेही स्वताला खूप भाग्यवान समजायचो, की आम्ही तुमच्या सारख्या आईवडीलांच्या पोटी जन्म घेणार आहोत. बाबा तुमची लाडकी वृ...