ती आणि तिची आठवण ( एक वेड प्रेम )
अलीकडेच ती आणि मी एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. ती माझी आणि मी तिचा झालो होतो. तिची आणि माझी नेहमी संध्याकाळी समुद्र किनाऱ्या जवळ भेट व्हायची कारण तस आम्ही ठरवलं होतं. उशीर होऊ नये म्हणून मी अर्धा तास लवकर समुद्र किनाऱ्या जवळ येवून बसायचो.. ती हळूच मागे येऊन उभी राहायची. तिच्या कोमल हातानी ती माझे डोळे झाकायची आणि ( ओळख कोण आहे मी म्हणायची.) मी ही मुद्दाम नाटक कराचो चूकीचे नावे घेऊन तिला सतावायचो.. मग ती कंटाळून म्हणायची काय रे प्रेम करतोना तु माझ्यावर तरीही तुला ओळखू येत नाही का मी. मग ती माझ्यावर चिडायची पण त्या वेडीला निट चिडता पण येत नव्हत. मी Sorry बोलल्यावर ती मला लगेच माफ करायची. कारण खुप प्रेम करायची ती माझ्यावर, समुद्राच्या लाटां सारखे तिचे प्रेम होते त्यामुळे तिला सावरायला मला कधी कधी किनारा व्हाव लागायचं. सुर्यास्ताच्या वेळी ती प्रेमाने माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची. प्रेमाच्या काही गोष्टी करायची. आणि म्हणायची काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाही.. तुझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही मी होणार नाही.... तिच्या अश्या बोलणयावर मी ही खूश होयचो.. तिच्या चेहर्यावर नेहमी...