ती आणि तिची आठवण ( एक वेड प्रेम )
अलीकडेच ती आणि मी एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. ती माझी आणि मी तिचा झालो होतो. तिची आणि माझी नेहमी संध्याकाळी समुद्र किनाऱ्या जवळ भेट व्हायची कारण तस आम्ही ठरवलं होतं. उशीर होऊ नये म्हणून मी अर्धा तास लवकर समुद्र किनाऱ्या जवळ येवून बसायचो.. ती हळूच मागे येऊन उभी राहायची. तिच्या कोमल हातानी ती माझे डोळे झाकायची आणि ( ओळख कोण आहे मी म्हणायची.) मी ही मुद्दाम नाटक कराचो चूकीचे नावे घेऊन तिला सतावायचो.. मग ती कंटाळून म्हणायची काय रे प्रेम करतोना तु माझ्यावर तरीही तुला ओळखू येत नाही का मी. मग ती माझ्यावर चिडायची पण त्या वेडीला निट चिडता पण येत नव्हत. मी Sorry बोलल्यावर ती मला लगेच माफ करायची. कारण खुप प्रेम करायची ती माझ्यावर, समुद्राच्या लाटां सारखे तिचे प्रेम होते त्यामुळे तिला सावरायला मला कधी कधी किनारा व्हाव लागायचं. सुर्यास्ताच्या वेळी ती प्रेमाने माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची. प्रेमाच्या काही गोष्टी करायची. आणि म्हणायची काहीही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाही.. तुझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही मी होणार नाही.... तिच्या अश्या बोलणयावर मी ही खूश होयचो.. तिच्या चेहर्यावर नेहमी आनंद रहावा म्हणून मी तिच्यावर कविता करायचो...
आज तिचा Birthday होता तिला surprise द्यायच ठलवल होत..म्हणून तिला भेटण्यासाठी संध्याकाळी मी समुद्र किनाऱ्या जवळ येवून बसलो होतो. आज पुन्हा तिला सतावायच ठरवल होत.. बघता बघता तीच्या येण्याची वेळ जवळ आली होती. पण ठरवलेल्या वेळेनुसार ती आली नाही. कदाचित ऊशीर झाला असेल निघायला तिला किंवा रुसली तर नसेल ना माझ्यावर. अस मी माझ्याशी च बडबडलो आणि तिची वाट बघत बसलो. आता तिला यायला खूप ऊशीर झाला होता म्हणून माझे डोळे तिच्या येण्याच्या मार्गाकडे आस लावून बसले होते. बघता बघता अर्धा तास झाला तिला न येऊन, म्हणून तिला Call करायच ठरवल.. तिला Call केला पण Call not reachable होता. म्हणून मी तिच्या मैत्रिणी ला Call केला. तेव्हा तिची मैत्रीण बोलली (अरे Yaar तुला समजत कस नाही तिला हे जग सोडून आज 1 महीना झाला जरा शुद्धीत ये असा वेड्या सारख नको वागू. सत्य मान्य कर Please आणि तीने Call cut केला).. पण हे सत्य मी आजपर्यंत पचवू शकलो नाही.. ती दूर गेली आहे माझ्या पासून अस मला कधी वाटलच नाही कारण तिचा असण्याचा भास नेहमीच होतो. मी तिच्यावर आजही खूप प्रेम करतो.. . ती ईतकी गोड होती की देवालाही कदाचित आवडली असावी म्हणून तो तिला माझ्या पासून दूर घेऊन गेला.. ती माझ्या पासून जरी दूर गेली तरी ती माझ्या ह्रदयाच्या नेहमीच जवळ राहील...
(त्या दिवशी ना मी गाडी जोरात चालवली असती ना ती माझ्या पासून दूर गेली असती..)
✒
~ करण बेंडकुळे.
Comments
Post a Comment