एड्स म्हणजे काय..?? ( पडलेल्या प्रश्नांची केलेली टाळाटाळ.)
एड्स म्हणजे काय..??
( पडलेल्या प्रश्नांची केलेली टाळाटाळ.)
रोज सकाळी नेहमी प्रमाणे श्याम आणि त्याचे बाबा गुलाबी थंडीत घरा जवळच्या मैदानात व्यायामासाठी जातात. आज रविवार होता त्यामुळे श्याम चे बाबा त्याला बोले की आज जास्त वेळ व्यायाम करू त्यावर श्याम बोला की ठिक आहे बाबा. पण व्यायाम करता करता त्यांना वेळच भान राहिलच नाही 9 वाजून गेले त्यामुळे श्याम चे बाबा त्याला बोले की आज खूप उशीर झाला आहे चल पटकन नाही तर तुझी आई खूप ओरडेल आपल्याला. म्हणून दोघे जन घाई घाईत घराच्या दिशेने निघाले. पण घराच्या दिशेने जात असताना वाटेतच एक महाविद्यालय लागत. महाविद्यालयात आज कसली तरी रॅली होती हे बघून श्याम त्याच्या बाबाला बोलला की थांबाना बाबा रॅली बघून जाऊ. रॅली बघून श्यामच्या बाबाना ही कुतूहल वाटले म्हणून ते ही ठीक आहे पण 5 मिनिटे थांबूया अस श्यामला बोले. पण जशी रॅली महाविद्यालयाच्या बाहेर निघाली ते बघून श्यामच्या बाबाचे हावभाव बदलले. ते श्याम ला बोलले की चल घरी पटकन ऊशीर झाला आहे पण त्यांना भिती होती तेच झाल तेवढयात 12 वर्षाच्या श्याम ने रॅली कडे बघुन त्याच्या बाबाला विचारले बाबा हे एड्स म्हणजे काय. श्यामचे बाबा जरासे गोंधळले त्यांच्या कडे श्यामच्या प्रश्नाचे उत्तर होते पण सांगाव कस हेच त्यांना कळत नव्हत. परत एकदा श्याम ने त्याच्या बाबाला विचारल सांगाना बाबा ऐड्स म्हणजे काय आणि त्यांनी ती रॅली का बर काढली.( पण श्यामच्या बाबानी त्याच्या प्रश्नांच उत्तर टाळायच ठरवलं. कारण जर श्यामला ह्या बद्दल सांगितलं तर तो बिघडून जाईल अस त्यांना वाटत होत ) श्यामचे बाबा श्यामला बोलले की चल गाढवा काय मूर्खावानी प्रश्न विचारात बसला. तुझी आई घरी वाट बघत असेल आपली. आणि श्यामच्या बाबानी वेळ प्रसंगी काढता पाय घेतला.
श्यामच्या बाबानी श्यामच्या प्रश्नांच उत्तर देण्याच आज टाळाले पण भविष्यात काय...??
आजही आपल्या कडे ऐड्स बद्दल मनमोकळेपणाणे बोलले जात नाही. पालक ही त्याच्या पाल्यांन ऐड्स बद्दल काही सांगत नाही.. जनजागृती कितीही केली तरी लोक ती विसरून जातात. आणि होत्याच नव्हत होत.
~ करण बेंडकुळे.
~ करण बेंडकुळे.
Nice
ReplyDelete