माझं मन

माझ मन जरास शहाणं जरास वेड आहे.
सहजासहजी समजणार नाही अस एक कोड आहे.
दुसऱ्याना हसवणारा एक  विदूषक, पण
स्वतःच दुख लपवून वावरणारा एक उत्तम नायक आहे.
प्रेमात असतो तेव्हा एक कवी, तर स्वताची गोष्ट मांडणारा एक लेखक आहे.
हट्ट पुरवून घेणार लहान बाळ आहे.
तर दुसर्‍याचे हट्ट पुरवणारा एक बाप आहे.
डोक्यानी घेतलेला निर्णय त्याला कधीच पटत नाही. 
कारण त्याने घेतलेल्या निर्णयावर आजपर्यंत मी ही शंका केलेली नाही.
तो परीणामाची परवा करत नाही, कारण त्याला हवं तसंच घडत.
लोकांची तो परवा करत नाही, कारण त्याला त्याच्या मर्जीने जगायला आवडत.
त्याला स्वप्न बघायला खूप आवडत.
फक्त स्वप्नच नाही तर त्या स्वप्नात तिलाही बघायला आवडत.
तो आनंदाचा मकरंद शोधण्यासाठी कधी फुलपाखरू होतो.
तर भेटलेला मकरंद वाटण्यासाठी स्वताच मधाच रूप घेतो.
म्हणून म्हणतो मी,
माझ मन जरास शहाणं जरास वेड आहे.
सहजासहजी समजणार नाही अस एक कोड आहे.

~ करण बेंडकुळे.

Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...