माझ्या आठवणीतील शाळा (हलकं फुलकं)

विषय क्र. 3 : माझ्या आठवणीतील शाळा (हलकं फुलकं)

करण बेंडकुळे ( नाशिक )
Instagram : @Karanbendkule1997

https://karanbendkule1997.blogspot.com/


आठवणीतली शाळा, आठवणीतली शाळा म्हणता म्हणता मला आठवली माझी शाळा.
जेव्हा घरून निघायचो शाळेला
ड्रेस घालूनी, पावडर लावूनी,
थोडी रूमालात घेऊनी
सोबत दफ्तराचे ओझे पाठीला.
नेमक शाळेत गेल्यावरच आठवायच गृहपाठ राहीला अपूर्ण.
पण शिक्षकांना कारण देऊन, तो कधीच केला नाही पूर्ण.
शेवटच्या बाकावर बसायला नेहमी करायचो  धडपड सारी.
कारण शेवटच्या बाकावरच अनुभवायला मिळायची मित्रांची दुनियादारी.
मधली सुट्टी म्हणजे आमच्या जिव्हाळ्याची होती.
एकमेकांचा डबा खायची मज्जा कोणत्याही 5 स्टार हाॅटेल मधे नव्हती.
शाळेत असतांना प्रेमाचे वारे खूप वाहत होते.
त्या वार्‍यामधे लाल रंगाचे आमचेही झेंडे फडकत होते.
शाळेच्या भिंती पासून ते ह्रदया पर्यंत तिचेच नाव कोरले होते.
जिगरी मित्रामुळे जुळलेले ते प्रेम खरच खूपच सुंदर होते..
दंगा मस्ती करता करता परीक्षा जवळ यायची.
पास होण्यासाठी सर्व मित्रमंडळी काॅपीचा आधार घ्यायची.
निकाल लागायच्या दिवशी मनात जरा धाकधूक होयची.
पण निकाल लागल्यावर काॅपी करणार्‍याचीच हवा होयची.
बघता बघता शाळेचा तो शेवटचा दिवस आला.
मित्रमंडळी दूरावणार होती हे जराही पटल नाही मनाला.
शाळेला निरोप देताना सर्वाचे डोळे पाणावले होते.
कधी न रडणारे मित्र मात्र अश्रू लपवायचा प्रयत्न करत होते..
आठवल्यावर आठवणीतली शाळा चेहर्‍यावर एक वेगळेच हसू येते..
आठवणीतली शाळा आठवल्यावर पुन्हा शाळेत जावेसे वाटते..
                               ~ करण बेंडकुळे



Comments

Popular posts from this blog

अंश आणि वृंदा The Death Before Born...

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?