माझ्या आई-वडिलांनी माझ्यात रुजवलेले संस्कार (मुक्त)
करण बेंडकुळे. ( नाशिक )
http://www.Instagram.com/Karanbendkule1997
https://karanbendkule1997.blogspot.com/
सर्वाचे आईवडील आपापल्या पाल्यांवर गर्भातच किंवा जन्मताच संस्कार करत असतात. आपल्या मुला-मुलीचे समाजात नाव व्हावे असे प्रत्येक आईवडलांना वाटत असते. म्हणून प्रत्येकाचे आईवडील आपापल्या मुला/मुलीवर चांगले संस्कार करत असतात. त्यांच्या जीवनाला एक चांगली दिशा देण्याचे काम ते सतत करत असतात. तसेच माझ्या आईवडिलांनी देखील माझ्यावर अनेक संस्कार केले आहे. पण एक संस्कार माझ्यावर असा ही केला कि तो मी या जन्मात काय पण पुढच्या सात जन्म विसरू शकणार नाही.
ही गोष्ट मी चौथीत असताना घडली.
आमचा पाच जणांनचा छोटासा मध्यवर्गीय असा परिवार. वडील तसे बॅंकेत कामाला होते पण त्यावेळी पगार कमी असल्यामुळे काटकसर करावी लागायची. शिवाय मध्यवर्गीय परिवार असल्यामुळे काटकसर करायची सवय ही मध्यवर्गीय परिवाराला जन्मतच देवाकडून मिळते. त्यामुळे माझे आईवडील देखील पैसे जमा करायचे. जस जमल तस ते पैसे भविष्याच्या दृष्टीने मागे टाकत असायचे. त्यासाठी त्यांनी बाजारातून एक प्लास्टिकचा गल्ला आणला होता आणि त्यात ते रोज किंवा जमल तस 5 रुपये, 1/2 रूपये टाकायचे. त्यामुळे मला देखील पैसे जमा करायची सवय लागली होती. मी पण पैसे जमा करायचो पण खायची वस्तु दिसली कि लगेच माझ्याकडील असलेले पैसे मी क्षणार्धात खर्च करायचो. पण एके दिवशी आमच्या ईथे एक आईसक्रीमवाला आईसक्रीम विकायला आला होता. माझ्या सर्व मित्रांनी आईसक्रीम घेतली होती त्यांच बघून मला देखील आईसक्रीम खायची ईच्छा झाली. पण त्या दिवशी घरी कोणीच नसल्यामुळे मला आईसक्रीम घेऊन द्यायला कोणीच नव्हतं. शिवाय माझ्याकडे पैसे पण नव्हते आईसक्रीम घ्यायला. त्यामुळे मी आईवडिलांनी काटकसरीने जमा केलेले गल्ल्यातील पैसे चुबंकाच्या साहाय्याने हळूच वर काढले आणि आईसक्रीम विकत घेतली. त्या दिवशी माझ्याकडून नकळत चोरी घडली होती. पण चोरी करताना मला कोणीच पकडल नसल्यामुळे माझ धाडस वाढत गेल आणि असच घरच्यांची नजर चूकवत मी गल्ल्यातील पैसे काढू लागलो. असचं मी तीन चार वेळा गल्ल्यातून पैसे काढण्यात यशस्वी झालो पण आईची नजर चुकवून चोरी करणारा मी कुठला ओ मोठा चोर. मग काय आईने पकडल ना मला रंगेहाथ आणि माझी जी धुलाई केली कि बस विचारूच नका. ज्या हातानी मी चोरी केली ना त्याच हाता वर आईने कायमची ओळखण करून ठेवली. खरच त्या दिवसा पासुन मी पैशाला हात देखील लावत नाही किंवा जर घरात पैसे पडले असेल तर मी त्यांच्याकडे बघत पण नाही आणि जरी त्यांच्याकडे बघितले तरी ते मी आईवडिलांकडे देऊन टाकतो. जर त्या दिवशी आईने मला चोरी करताना पकडल नसत तर आज मी एक चोर झालो असतो आणि असच चोरी करत जगलो असतो. आणि त्या दिवशी आईने मला मारल नसत ना तर मला पैशाची किंमत कळाली नसती. कष्टाच्या पैशात किती आनंद असतो हे मला कधीच कळालच नसतं.
( चोरीच्या भाकरी पेक्षा कष्टाच्या भाकरीत नेहमीच समाधानाची भुक क्षमवण्याची ताकद असते. )
ह्या प्रकारे माझ्या आईने माझ्यात रुजवलेला हा संस्कार मला समाजात एक चांगला व्यक्ति होण्यासाठी मोलाचा ठरला..
✒
~ करण बेंडकुळे.
( मेरी दुनिया )

Comments
Post a Comment