एखाद्या वळणावर अचानक झालेली भेट.*(मुक्त)*





करण बेंडकुळे. ( नाशिक )
http://www.Instagram.com/Karanbendkule1997

https://karanbendkule1997.blogspot.com/


एकंदरीत माझ आयुष्य खुप छान चालेल होत. ना कसली चिंता ना अंगावर कसली जवाबदारी मी माझ आयुष्य एकदम मस्त जगत होतो. सर्वाना हसवायच आणि त्यांचा आनंदी चेहरा बघून स्वताही आनंदी रहायचो. अस छान आयुष्य जगताना प्रत्येक क्षणाचा आनंद मी घेत होतो. पण ते म्हणतात ना चांगल्या गोष्टीना लवकर नजर लागते तस काहीस माझही झालं होत. माझ्या आयुष्यात एका वर्षात अशा काही घटना घडल्या कि माझ आनंदी आयुष्य क्षणार्धात उध्वस्त झाल. आयुष्याचे चटकदार क्षण चाखताना बेचव क्षण पण चाखायला लागतील याची मी कधीही कल्पनाच केली नव्हती. एकंदरीत वाईट परिस्थिति पाहता नशीबाने ही काढता पाय घेतला. त्यात कमी म्हणून की काय जवळची माणसंही(मित्र-मैत्रीणी) साथ सोडायला लागली. एक एक करत सगळे साथ सोडून जाऊ लागले. जणू साडेसातीच लागली होती माझ्या मागे. मैत्रीवरून हळूहळू विश्वास उडत चालला होता. नवीन मैत्री करायला माझ मन तयार होत नव्हत. प्रत्येक जणांनचा मी राग राग करायला लागलो होतो. नको-नको झाल होत मला या आयुष्यात राहून, जीवनाला पुर्णपणे कंटाळलो होतो मी. सतत न्यूनगंड निर्माण होयचा स्वताप्रती. एकेकाळी सर्वाना हसवणारा मी हसायचं विसरून गेलो होतो. हळूहळू नैराश्याचे काळे ढग माझ्या मनात दाटू लागले. नैराश्याचा संसर्ग मलाही झाला त्यामुळे सतत वाईट विचार मनात येऊ लागले. काय चूकल होत माझ कि माझ्या सोबत अशा वाईट घटना घडल्या. यायचा मी सतत विचार करत राहायचो आणि स्वताला दोष देत एकांतात रडायचो. त्यामुळेच कि काय आत्महत्या करायचा विचार सतत माझ्या मनात थैमान घालत होता. आपल्या मुळे दुसर्‍याला आणि स्वताला ही त्रास करून घ्यायचा नाही म्हणून मी एके दिवशी आत्महत्या करायच ठरवल. पण आपण आत्महत्या का केली याची कोणाच्या मनात सल राहू नये म्हणून मी आयुष्याला कंटाळून चाललो आहे अशी एक चिट्ठी लिहायची ठरवल. म्हणून मी एक पेन घेतला आणि आपण का आत्महत्या करतोय त्याच कारण एका कागदावर लिहून काढल. जस आत्महत्या करण्यामागच सर्व कारण मी एका कागदावर लिहून काढल तस माझ्या मनावरचा बोझा कमी झाला. पण लिहीलेली चिठी वाचताना काही तरी राहील्या सारख वाटत होत म्हणून मी पुन्हा एक चिट्ठी लिहीली आणि चिट्ठी लिहून झाल्यावर परत माझ्या मनावरील बोझा कमी झाला. काही मिनिटा पुर्वी मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण लेखणी हातात घेऊन मी माझ्या मनातलं कागदावर उतरवलं आणि माझा आत्महत्या करण्याचा निर्णय बदलला  तसेच माझ्या मनातील वर्षाभराचा बोझा लेखणी मुळे एका मिनिटात कमी झाला.
आणि लेखणी मुळे मी पुन्हा माझ पुर्वीच आनंदी आयुष्य जगायचा प्रयत्न करू लागलो.
त्या दिवशी लाभलेली लेखणीची साथ आजही टिकून आहे...
( त्या दिवशी आत्महत्या करण्याच्या वळणार लेखणीची अचानक भेट झाली नसती ना तर आत्महत्या करण्याचा विचार माझ्या मनातून नाहीसा झाला नसता आणि असाच माझा फोटो भिंतीवर लटकत पडला असता..)

          ✒
~ करण बेंडकुळे.
   ( मेरी दुनिया )

Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...