मुळात ती तशी नाही...
करण बेंडकुळे. ( नाशिक )
http://www.Instagram.com/Karanbendkule1997
https://karanbendkule1997.blogspot.com/
आज सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला होता. जरा कामात होतो त्यामुळे मला फोन उचलता आला नाही. पण 10 मिनिटांनी वडीलांचा फोन आला वडील बोलले अरे तुझ्या मैत्रीणीचा फोन आला होता जरा फोन करून बघ बर तिला. म्हणून मी काम आटोपून तिला फोन केला.
मी : काय ग फोन केला होता.
ती : अरे हो केला होता पण माकडा किती नंबर बदलतो आज वाढवा झाला असताना चूकन तुझ्या पप्पा ला फोन लागला.
मी : तु काही बोलली नाही ना वेड्या सारख.
ती : अरे मला वाटल तुच आहेस आणि तुझे पप्पा बोलत होते मी त्याचा पप्पा बोलतोय पण मला वाटल तू मजाक करतोय की काय पण नतंर कळाल की खरच तुझे पप्पा बोलत आहे मग मी लगेच फोन ठेवून दिला.
मी : मी जरा हसलो आणि बोलो अग पप्पांचा फोन येऊन गेला. त्यांनी सांगितल काय झाल ते तू टेन्शन घेऊ नको. आणि हा माझा एकच नंबर आहे तोच ठेव बाकीचे डिलीट कर.
ती : बर मला वाटल झाला आता वाढवा.
मी : काही नाही ग सोड तो विषय. आणि आज कस काय आठवण आली.
ती : काही नाही रे खुप दिवस झाले फोन नव्हता केला म्हणून चला म्हटलं आपणच करू फोन.
मी : हो का ..
ती : हो मग...
मी : काय चाललंय बाकी..
ती : काही नाही बस आताच काॅलेज वरून आले.
मी : ठीक आहे.
( बोलता बोलता खूप सार्या गोष्टी निघाल्या पण बोलताना तिच्या सोबत घडलेला प्रसंग तिने मला सांगितला.)
ती : अरे मागच्या महिन्याची गोष्ट आहे मला ना तो श्याम( नाव बदलले) भेटला होता.
मी : त्याच काय.
ती : अरे तो ना मला भेटला होता आणि आम्ही बोलत होतो. पण बोलता बोलता तेवढयात मला एका मित्राचा फोन आला आणि मी त्याला बोलले की मी तुला नतंर फोन करते. आणि तेवढयात श्याम बोलला कोण होत. तर मी बोलले मित्र होता रे.
मी : मग पुढे काय झाल.
ती : अरे तो मला खूप वाईट बोलला.
मी : हो का ( प्रश्नचिन्ह.??)
ती : अरे तो मला बोलला की ( तुला तर सवयच आहे 2/3 Handle करायची.)
मी : अरे बापरे,( मनातल्या मनात) खरच खूप वाईट बोलला ग तो तुला..
(खरच हे ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली.)
ती : बघना कसा बोलला तो आणि त्याचा मित्र ही खूप वाईट नजरेने बघत होता मला.
मी : मग तु त्याला काही नाही बोलली का.
ती : काय बोलणार तिथे खूप लोक होती.
मी : त्याला कळत नाही ग आपणच आपल्या मित्र-मैत्रीणीची इज्जत केली पाहिजे.
ती : हो णा.
मी : जाऊदे लक्ष नको देऊ त्याच्या बोलण्याकडे ( खर तर मी नि: शब्द झालो होतो. माझ्याकडे बोलायला काहीच नव्हतं.)
आणि मी फोन ठेवला.
पण दिवस भर हाच विचार माझ्या डोक्यात येत होता. तिच्या सोबत झालेला प्रसंग मी Feel केला होता. आणि मला खूप वाईट वाटल कुठे तरी मन मोकळं कराव म्हणून हा प्रसंग Share करावा वाटला..
कारण की,
आज ही आपल्या कडे मुलीना कोणीही समजून घेत नाही. जरा ती मुलांशी बोलली की लोक वेगळा अर्थ लावून मोकळे होता. आणि हव ते बोलायला मोकळे होतात पण कधी तरी त्या मुलीच्या मनाचा विचार केला आहे का तिला काय वाटेल..
( प्रत्येक मुलीचा आदर करा कारण की आपल्या जराश्या चूकी मुळे मुलीच्या चारित्र्यावर डाग पडला जातो. मुळात ती मुलगी तशी नसली तरी लोक तिला वाईटच नजरेने बघतात.)
जर तुम्ही कोणत्या मुलीला नकळत वाईट बोलले असाल तर तिला भेटून Sorry बोला...
नक्कीच तिलाही आणि तुम्हाला ही एक आंतरिक समाधान मिळेल..
✒
~ करण बेंडकुळे.
( मेरी दुनिया )

Comments
Post a Comment