सिंगल लोकांचा व्हॅलेंटाईन. *(निखळ विनोद)*
करण बेंडकुळे. ( नाशिक )
http://www.Instagram.com/Karanbendkule1997
https://karanbendkule1997.blogspot.com/
नमस्कार मंडळी मी सिंगल संघटनेचा सिंगल कार्यकर्ता व्हॅलेंटाईनच निमित्त साधून मी सिंगल लोकांचा अनुभव समस्त सिंगल बांधवांच्या वतीने सांगायला नाशिक हून आलोय...
तर ऐका मग...
व्हॅलेंटाईन आमच्या तत्वात बसत नाही,
कारण आम्हाला शोना, बाबू ,बच्चा या शब्दाचा वापर करून मिरवायला आवडत नाही..
जगतो आम्ही आनंदात कारण,
आमच्या मागे रिचार्ज मारून देणा म्हणणारी कटकटचं नाही..
आमचे पैशाचे पाकीट नेहमी पैशानेच गच्च भरलेले असते.
कारण पैसे उडवणारी भटक भवानीच आम्हाला आवडत नाही..
कसली ही चिंता न करता पोटभर आम्ही जेवतो कारण,
तु जेवली नाही तर मी पण जेवणार नाही
असे वायफळ उद्योग आम्हाला जमतच नाही.
आम्हा सिंगल लोकांना कोणाला मनवताच येत नाही.
कारण आम्हाला ते सोडून बाकीचे ही काम असतात हे कुणाला कळतच नाही..
आम्ही सिंगल लोक पावसाळ्यात क्वचितच भिजतो कारण आशिकी 2 ची पोज देऊन आम्हाला आजरी पडायला आवडत नाही.
पण पण,
मित्राच्या विरहाचा आम्ही मनमुराद आनंद लुटतो..
त्याच्यावर हसत आम्ही सिंगल असण्याचा अभिमान बाळगतो....
✒
~ करण बेंडकुळे.
( मेरी दुनिया )

Comments
Post a Comment