एक संध्याकाळ.


 

नुकताच मित्राच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी आलेला करण आईशी गप्पा मारत दिवसभर झालेल्या गमती सांंगत मोबाईल चाळत होता. तेवढ्यात मावशीचा करणला फोन आला आणि मावशी करणची मस्करी करत म्हणाली तु कधी करतो लग्न किती दिवस मित्रांचे साखरपुडे खात फिरणार? त्यावर करण उत्तरला, करूना तुम्ही बघा की चांगली मुलगी उद्या मंडपात उभा राहतो कि नाही बघा अस म्हणत करण नी हसत फोन ठेवला आणि परत मोबाईल चाळत बसला. तेवढ्यात करणला काव्याचा मेसेज आला.

काव्या : कुठे आहेस तु?

करण : घरी आहे मी!

काव्या : माझ्यासोबत येतो का डाॅक्टर कडे चालली आहे.

करण : हो येतो पण कुठे भेटू ?

काव्या : तु सांगना, कि थेट डाॅक्टरकडे येता?

करण : नाही नाही थांब, तु संभाजी चौकात उतर तिथून आपण सोबत जाऊ डाॅक्टरकडे.

काव्या : ठिक आहे पण लवकर निघ बस येईल आता.

करण : हो ठिक आहे मी आवरतो पटकन आणि येतो.

अस म्हणत करण आवरायला लागला संध्याकाळची वेळ असल्या कारणाने वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. करणला आवरताना पाहून आई बोलली आता कुठे निघाला तु? आताच बाहेरून घरात आला होताना मग कुठे? पण करण नी आईच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता आवरत राहिला. आणि मी कुठे जात नाहीये मित्राच काम आहे अस म्हणत घरा बाहेर पडला.


 करणसाठी काव्याला भेटणं कुठल्या सणा पेक्षा कमी नव्हतं त्यामुळे तो तयार होऊन गाडीवर काव्याला भेटण्यासाठी सुसाट निघाला. 

दहा मिनिटात करण ठरलेल्या ठिकाणी पोहोचला आणि त्याच्या पाठोपाठ काव्याही पोहचली.

बस मधून उतर काव्य पुढे उभा असलेला करणच्या दिशेने चालत आली आणि करणच्या गाडीवर बसली.


करण : हाय मॅडम कशा आहात?

काव्य : मस्त!

करण : नेमके कुठे आहे डाॅक्टरच क्लिनिक?

काव्य : आर.के. वर आहे तु चलना मी तुला सांगते बरोबर. पण हा तु वरती येऊ‌ नको हां डाॅक्टर मम्मीला पण ओळखतो तर तो सांगेल दादा पण आला होता सोबत. परत मम्मी विचारलं कोण होत काय ते.

करण : ठिक आहे काही हरकत नाहीं तु जा मी बाहेरच थांबेल.

काव्य‌‌ : ठिक आहे.


१० मिनिटात करण आणि काव्या डाॅक्टरकडे पोहचले.

काव्या करणरला म्हणाली कि तु ईथेच थांब मी आलेच. मी डाॅक्टरकडे जाऊन आल्यावर आपण गंगेवर जाऊ, मला ना गंगाजल घ्यायच आहे. खरंतर करण्याच्या मनात आधी पासूनच होतंच कि काव्याला गंगेवर घेऊन जावं आणि काही क्षण तिथे तिच्या सोबत घालवावे. बहुतेक देवाने करणंच ऐकलं असावं.


काव्या डाॅक्टरकडे गेली आणि करण बाहेर त्याच्या विचारात गुंतला.

का म्हणून आपल्या सोबत हे सारं घडलं? आज जर ती असती तर तिलाही मी डाॅक्टरकडे घेऊन गेलो असतो. माहित नाही कशी असेल ती फोन करू का तिला? नाही नको तिने तर ब्लॉक केल आहे मला परत नको तेच. पण का म्हणून यार, असे खुप विचार करणच्या डोक्यात थैमान घालत होते. तेवढ्यात करणचं लक्ष घड्याळाकडे गेल आणि तो भुतकाळातून बाहेर पडला. काव्या अजून आली नाही म्हणून तो काळजी करत डाॅक्टरच्या क्लिनिक कडे पाहून लागला. कुणीतरी आपल्याला विश्वासाने सोबत घेऊन आलाय ही भावना करणला त्या क्षणी जबाबदारीची जाणीव करून देत होती. खरंतर काव्यानी करणवर ठेवलेला विश्वास करणला आयुष्याभर जपायचा आहे कारण करणला नाते जपायच खुप वेड आहे.


अर्धा तास झालावर काव्या बाहेर आली.

काव्या : साॅरी यार डाॅक्टरने खूप उशीर करून‌ दिला.

करण : काही नाही एवढे आता सांग कुठे जायचं.

काव्या : चल ना गंगेवर जाऊयात!

करण : ठिक आहे चल.


आणि दोघेही गंगेच्या दिशेने निघाले. संध्याकाळची वेळ असल्याने खूप थंडी पडली होती त्यामुळे काव्याला खुप हुडहुडी भरली होती आणि बोलताना तिचे नाजूक होठ एकमेकांस भेटण्यास तयार होत नव्हते.

गंगेवर पोहचल्यावर करण नी काव्याला विचारलं?

करण : तु कधी रात्रीच्या वेळेस इकडे आली आहे का?

काव्य : एकदा आली होती खुप छान वाटतं इकडे रात्रीच्या वेळेस.

करण : होना खुप छान वाटतं मी मागच्या वेळेस आलो होतो खरंच नाईट लाईफ जगायला हवी आपण.

काव्या : होना यार.

करण : चल आपण तिकडे जाऊ तिकडे भेटेल आपल्याला गंगाजल.

काव्या : हो चल.


अस म्हणत दोघेही गप्पा मारत गाय मुखाच्या दिशेने गेले. काव्याने गंगाजल भरण्यासाठी घरून बाटली आणली होती पण एकच बाटली आणल्या कारणाने काव्या माऊशीसाठी गंगाजल नाही घेऊन शकली. गंगाजल भरल्यानंतर करणनी काव्याला कपालेश्वर मंदिरात जाण्यासाठी विचारलं त्यावर काव्याही तयार झाली. शुक्रवार असल्या कारणाने मंदिरात भाविकांची गर्दी बोटावर मोजण्या ईतकी होती त्यामुळे वातावरण शांत आणि भक्तीमय होत. दोघेही मंदिरात गेले देवापुढे नतमस्तक झाले. काव्याच माहित नाही पण करणनी काव्यासाठी देवाकडे प्रार्थना केली कि माझ्या काव्याला सुख शांती दे आणि तिला होणारा त्रास कमी होऊ दे.

मंदिराला प्रदक्षिणा घालून करण आणि काव्या गंगाच्या काठी जाण्यास निघाले. काव्याला हुडहुडी भरलेली पाहून करणनी घातलेलं जॅकेट काढून काव्याला घालण्यास सांगितले पण काव्या नाही म्हणत होती पण करण ऐकलं तो कुठला. 


गंगाकाठी पोहोचल्यावर करण आणि कव्या एका ठिकाणी बसले.


करण : मग काव्या कसं वाटत आहे आता?

काव्या : छान वाटतं आहे एकदम फ्रेश फ्रेश.

करण : होना अस रोज भेटलो तर किती छान ना.

काव्या : होना पण काय? शक्य नाही होत ते तुला तर माहीत आहे.

करण : असो हरकत नाही.


पण बोलता बोलता काव्या अचानक शांत झाली आणि बस करणची बडबड ऐकत राहिली ते पाहून करण बोलला.

करण : काव्या ये काव्या काय गं शांत झाली, बोलना काय झालं बोलना काहीतरी.

काव्या : काही नाही रे करण पण खूप त्रास होतोय ह्या साऱ्याचा.‌ कुणी एवढ कसं काय बदलू शकतं?

करण : हे बघ काव्या लोक गरजेचे नुसार उपयोग करतात आणि आपल्याला वाटत आपण त्यांच्यासाठी स्पेशल आहोत. पण तु काळजी करू नको देव बघतोय सारं करेल तो कहीना काही, फक्त तु रडत बसू नको आणि हिंमत हारू नको एक दिवस आपला असेल.

काव्या : हो करण जाॅब लागू दे फक्त मी हे सारं विसरून जाईल आणि जाऊदे सोड हा विषय आपल्याकडे वेळ नाहीये आणि बोलन अर्ध राहून जाईल. आपण पुढच्या वेळेस बोलू ह्या विषयावर, आता निघूयात आपण घरचे वाट बघत असेल.

करण : हो काव्या ठिक आहे निघूयात आपण, पण जरा ५ मिनिट बसना मग निघूयात.

काव्या : ठिक आहे.

करण : हे बघ काव्या तू जगण्याचा दृष्टीकोन बदल आणि हा धिर धर आशा सोडून नको होईल सगळं ठिक मी आहे ना! अस म्हणत करण शांत झाला. कारण करणला काव्याला ह्या हालत मध्ये पाहून समजावं कस हेच कळत नव्हतं. एकीकडे करण काव्यावर मनापासून प्रेम करत आहे हे तिला माहीत आहे. पण आपल्या बोलण्याचा तिंने चूकीचा अर्थ नको घ्यायला, म्हणून करणला काव्याचा हात हातात घेऊन साधा विश्वासही देता आला नाही आणि प्रेमाने जवळ ओढून मायेने डोक्यावर हात फिरवून म्हणताही आलं नाही की काव्या मी आहेना सोबत. पण हे जरी कृतीत करता आलं नसलं तरी करण काव्या सोबत तिची सावली बनून कायम असेल.


काव्या : हो करण चल आता निघूयात उशीर झालाय घरचे वाट बघत असतील.

करण : ठिक आहे पण तुला जॅकेट घालावं लागेल तुला खुप थंडी वाजत आहे.

काव्या : नाहीरे काही नाही एवढ.

करण : गप बस आता मी तुझ काही एक ऐकणार नाही हे घे जॅकेट घाल आणि चल बरं.

करणचं ऐकत काव्याने जॅकेट घातलं आणि दोघेही गाडीवर बसवून घराकडे निघाले.

मैत्री निभावताना कधीही घरच्या कर्तव्यास विसर पाडून नाही द्याचं हे तिच्याकडून मला आज कळाल.©तारंग.


Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...