रूप.

 रुप तुझ लावण्याचं,

जणू इंद्राची तु अप्सरा.

शृंगार करते ऐसा,

पाहून होतो चंद्र लाजिरा.

चांदण्या डौले तुज कानात होऊन झुमके,

जसा क्षण नक्षत्रांचा साजिरा.

तुझ्या ओठांवर लाली सजते,

जणू सुर्यास्ताचा सुर्य गोजिरा.

तुझ्या नयनांच्या पापण्यांना,

जसा काजळाचा किनारा.

तुझ्या नाकाची बारीक मुरणी,

जणू चंद्राच्या रूपाला डागाचा सहारा.©तारंग.






Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...