चुरघळलेली कविता.

 

मज चुरघळलेल्या कवितेतून,

तुझ आठवणींचा गंध येतो.

जैसे चुरघळलेल्या फुलामधून,

सुगंध दरवळतो.

लेखणी मुखी नाम तुझ,

कागदावर जप-नृत्य होतो.

जैसे वृंदावनी भक्त,

राधे-राधे म्हणसी नृत्य करतो.

भाव कवितेला तुझा,

तुझाच कवितेला शब्दानु स्पर्श होतो.

जैसे सुकलेल्या वृक्षाला,

वसंत संपूर्ण संजिवीत करतो.

प्रत्येक कवितेत नाव तुझ,

प्रत्येक कवितेला तुझा अर्थ प्राप्त होतो

जैसे हरी भक्तीत प्रत्येक भक्त,

राधे-राधे नाम जपतो.

तुच तु, तुच श्वास, तुच ध्यास

तुच जगण्याची एक आस, 

तुच कोमल "कोमल" एक स्पर्श, तरसलो मी, तरसत राहणार आयुष्यभर तुझ्या एका स्पर्शास.©तारंग.


Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...