|| संजिवनी संजिवीत संयोग संजोग ||
दि.०९.०७.२०२२ ते ३१.१२.२०२२
हल्ली मी कुणासाठी कविता लिहीत नाही आणि कवितेतही कुणाला गुंफत नाही. पण गेल्या पाच सहा दिवसांपासून का? माहित नाही पण राहून राहून सारखं वाटतं की तुझ्या प्रती माझ्या भावना लेखणी द्वारे कवितेतून तुला कळाव्यात म्हणूनच आज तुझ्यासाठी लिहितोय. खरतर तुला पाहता क्षणी तु मनात भरली होती आणि हा ते चित्रपटात दाखवतात तुझे देखते ही दिल के तार छिड गए तशी इथे काय भानगड नाही कारण तुझा साधेपणाच तुला इतरांपासून वेगळा करतो आणि मला भावतोही त्यामुळेच तु त्या साधेपणाला कायम जपशील, जपशील ना?
आणि तुला एक सांगू जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा खरंच तुझ्याकडेच पाहत राहावंस वाटत होत कारण,
तुझ ते स्मित हास्य
अन हसताना गालावर पडणारी खळी.
मांजरी सारखे इवलेसे दात,
अन कृष्णवर्णीय रंगाची तु सावळी.
देहाने जणू तु हरणी,
मन मोहीत करते मोहिनी.
तुला पाहत रहावे वाटते असे,
जसे तुझ्यात दिसते मला माझी भावी अर्धांगिनी.©तारंग.
खरतर आज तुला आय लव्ह यू बोलू वाटतंय!
का? म्हणून याच कारण विचारू नको.
कारण, कारण सांगण्या सारख नाहीये पण इतकं सांगेल की मी तुझ्या कृष्णवर्णीय रंगाच्या प्रेमात पडलोय आणि हा ते कसं विसरून चालणार? तुझे ते मांजरी सारखे इवलेसे दात! कुठेतरी तेंही तुझा विचार करण्यासाठी मला भाग पाडतात.
पण इथे तु शब्दांना समजून घे कारण मी तुझ्या नाही तर तुझ्या कृष्णवर्णीय रंगाच्या प्रेमात पडलोय पण ही गोष्ट तु वाचू शकत नाही आणि मी तुला सांगू ही शकत नाही कारण आपल्यातील असणार अनोळखी अंतर! आणि हेच अनोळखी अंतर मला नकळत तुझ्या प्रेमात पाडतय.©तारंग.
कधी कधी वाटतं की तुझ्यासाठी लिहीलेल्या कविता तु कधी वाचल्याच नाहीतर, माझं लिहीण व्यर्थ तर नाही जाणार ना?
मी लिहिलेल्या कविता तु वाचाव्यात हवंतर तु याला माझा बाल हट्ट समज नाहीतर अजून काही कारण त्या कविता फक्त कविता नसून माझ्या भावनांचा तुझ्या प्रती असणारा पवित्र उगम स्त्रोत आहे. तु विचारही करू शकत नाही,
तुझ्या कृष्णवर्णीय रंगात
मला माझा कृष्ण दिसतो.
जणू मी तुझी राधा होऊन,
तु मला माझा वृंदावनीय कृष्ण भासतो.
पण कुठेतरी मी कारणीभूत आहे ह्या साऱ्या गोष्टींना कारण मी आपल्यातील अनोळखी अंतर कायम टिकून ठेवण्यातच धन्यता मानतो. पण मला कळत नाही काय करावं? कारण तु जर कविता वाचल्या आणि आपल्यातील अनोळखी अंतर संपलं तर कवितेचा "क" लिहीण सुद्धा कठिण होईल त्यामुळे हे द्वंद्व एका चक्रव्यूह सम झालंय बघ.
पण तरीही तुझ्यासाठी कविता लिहिणं कधी थांबणार नाही.
तु माझी पुजा,
अन मी तुझा पुजारी.
देवाच्या आराधन्यात,
बात तुझ्या सहवासाची सारी.
जैसे घेतो तुका नाम
पांडुरंग हरी.
तुझ्या नावाचा श्वास घेतो,
हा देवाचा पुजा-री.
मृदुंगाच्या तालावरती
ठेका धरतो वारकरी.
तुझ्या पैंजणांच्या आवाजावर
मी विसरतो देहू आळंदीची पंढरी.
ओढ लागते प्रत्येका,
जाऊन भेटण्या पांडुरंग हरी.
अन मी वेडा तुझ्याच भक्तीचा,
जसा पुजाची पुजा करणारा पुजारी.©तारंग.
आज अचानक तु समोर येता,
हृदयाची गती वाढली.
होठांची थरथराट होऊन,
नजर चोरून तुझ्याकडे रोखली.
मन मात्र शांत-उदास,
भुतकाळात रमलेलं.
तुझ्याकडे पाहून वाटलं,
ते तर तुझ्यातच गुंतलेलं.
पण कुठेतरी मी माघार घेऊन,
पुन्हा भुतकाळात रमलो.
परत नको जखमांवर खोल जखम,
म्हणून पुन्हा शांत झालो.
पण शांत झाल्यावर मी,
जुन्या आठवणीत लीन होत होतो.
अन तु समोर येता,
जसा पुजा करताना पुजारी तल्लीन होतो.
पण आता शांत राहूनच खुप काही बोलायचंय.
एकदा तरी तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचंय.
सांग देशील का अनुमती?©तारंग.
ती वेंधळी आहे जराशी.
बडबडते स्वताच्या मनाशी.
नयन तिचे बोलके जणू,
वाट पाहतात त्याच्या येण्याची.
होठ तिचे कोमल जसे,
फुलतात त्याच्या चाहूलीशी.
मनात काहूर असते तिच्या,
जणू ओढ लागली त्याच्या भेटीची.
पण तोही वेडा तिच्या सारखा,
आश्वासना शिवाय नाही काही बोलायचा.
उद्याचा दिवस त्याचा नाही कधी उगवायचा.
जसा स्वता राधा होऊन तिला कान्हा सारखं तरसवायचा.©तारंग.
का येते अचानक समोर,
माझ्या हृदयाची चोर.
नयन शांत तिचे अन,
गाली हास्यावर जोर.
बोलण्याचा असफल प्रयत्न माझा.
पण पाहून तिला आनंदून जातो,
मज मनाचा श्रावणीय मोर.
बोलत नाही ती काही माझ्याशी,
पण मला पाहून मात्र लाजेने अर्धी होते,
जणू चंद्राची कोर.
पाहत रहावे वाटते तिला असे,
जसे ती माझी राधा अन मी तिचा मुरली मनोहर.©तारंग.
मी लिहिलेल्या कवितेचा,
तु जो काही अर्थ घेशील तो मान्य असेल मला.
मग तो योग्य असो किंवा अयोग्य हरकत नाही. पण हा, एक अट मात्र आहे माझी,
की मनातील अर्थ ओठांवर आणायचा.
आणि ओठांचा अर्थ मला नाही सांगायचा.
आणि मी केलेल्या कवितेच्या प्रत्येक शब्दांत- तुझ्या रंग छटाचा,
वाऱ्याच्या बेभान होऊन डोलणाऱ्या बटांचा.
अन त्याच वाऱ्यावर नाचणाऱ्या झुमक्याचा.
पाऊसात भिजल्यावर,
ओल्याचिंब केसातूं टपकणाऱ्या थेंबाचा.
अन पाठीवरून ओघळताना थेंबामुळे आलेल्या शहाऱ्यांचा.
डाळींबा सारख्या लाल बुंद झालेल्या ओठांचा
स्पर्श अनुभवताना,
तुझ्या मिठीत स्वर्ग अनुभवावा सुखाचा.
अन भिरभिरणाऱ्या नयनांना पाहण्या ओढ लागली क्षण मिलणाचा.
-अलंकार मांडेल तेव्हा त्या कवितेची तुलना तु प्रणयाच्या अर्थाशी न करता सरळ अर्थाने केली तरी मान्य असेल मला.
कारण तुझ्यासाठी लिहिलेल्या कविता, फक्त कविता नसून तुझ्यात सामावून जाण्याचा एक स्वर्गीय मार्ग आहे.©तारंग.
पाहतेस तु स्वप्न,
आपल्या आयुष्या परी.
पण थांब ना एकदा,
जाणून घे ह्या काट्याची कहानी खरी.
वाटत असेल तुला,
हा काटा गुलाब जरी.
पण परिस्थितीनुसार झालाय,
हा गुलाब पूर्णपणे काटेरी.
राहीला ना गंध-न-छंद मला,
बस दुःखाचा बाजार घेऊन बसतो हा लिखारी.
अन त्यामुळे नैराश्याच्या मिठीत मी भासतो असा,
जसा मी आहे नात्यांचा भिकारी.
पण स्वप्न पाहण्या आधी,
तु जाणून घे माझी दुःखी कहाणी खरी.
प्रेमात बंद केलेल्या डोळ्याना एकदा उघडून बघना,
मी वास्तव दाखवणारा आरसा ठेवलाय तुझ्या सामोरी.©तारंग.💔
पाहतेस तु स्वप्न,
आपल्या आयुष्या परी.
पण थांब ना एकदा,
जाणून घे ह्या काट्याची कहानी खरी.
वाटत असेल तुला,
हा काटा गुलाब जरी.
पण परिस्थितीनुसार झालाय,
हा गुलाब पूर्णपणे काटेरी.
राहीला ना गंध-न-छंद मला,
बस दुःखाचा बाजार घेऊन बसतो हा लिखारी.
अन त्यामुळे नैराश्याच्या मिठीत मी भासतो असा,
जसा मी नात्यांचा भिकारी.
पण स्वप्न पाहण्या आधी,
तु जाणून घे माझी दुखी कहाणी खरी.
केलेल्या बंद डोळ्याना एकदा उघडून बघना, मी वास्तव दाखवणारा आरसा ठेवलाय तुझ्या सामोरी.©तारंग.
कई ख़त लिखकर भेजे हैं,
उन्हें पढ़ना है तुम्हें।
पर भेजें ख़त मे एक भी अक्षर नहीं होगे,
फिर भी उस खत को समझना है तुम्हें।
मैंने भावना का गंध ख़ाली खत पर छिड़का है,
उसे आंख बंद कर महसूस करना है तुम्हें।
मैंने मेरा पुरा जीवन तुम्हें समर्पित किया हैं,
बस यहीं अल्फ़ाज़ खाली ख़त मैं पढना है तुम्हें।
क्या पढ़ पाओगी तुम?©तारंग.
नकळत तुझ्या सोबत सुरू झालेला हा अविस्मरणीय प्रवास खरंच अवर्णनीय आहे. कारण तुझा हात हातात घेऊन, मोठ्या विश्वासाने तुझ्यावर विश्वास ठेवून आयुष्याच्या वाटेवर चालताना वाटेतील प्रत्येक काटे आता तुझ्या सोबत फुल भासत आहे. त्यामुळे तुझ्या प्रेमरंगी-सम-वसंत चाहुलीने आयुष्य नव्याने जगायला लागलोय. तुझ्या एका स्पर्शाने हा अखंड वाळवंट श्राप मुक्त होऊन नव्याने बहरायला लागलाय, जसा तुझ्या गर्भातूनच मी नवीन जन्म घेतलाय आणि हा, हा नवा जन्म सार्थकी व्हावा म्हणून मला तुझ्या प्रेमात स्वतःला पुर्णपणे वाहून द्यायचं आहे.
इतकं की,
मला तुझ्या कृष्णवर्णीय,
रंगात रंगायचंय.
तुला माझा कान्हा बनवून,
मला तुझी राधा व्हायचंय.
प्रेमात तुझ्या पुर्ण वेड होऊन,
तुझीच मीरा बनायचंय.
तु मुरली मनोहर माझी,
मला तुझीच बासरी व्हायचंय.
तु वाजवे बासरी यमुना तीरी,
मला त्या बासरीचे स्वर व्हायचंय.
तुझ्या मस्तकी शोभणारा पंख,
म्हणजे मला तो मयुरपंख व्हायचंय.
अन आठवणीत तुझ्या मुखातून निघणारा,
तो राधे-राधे शब्द व्हायचंय.©तारंग.
मैं खामोशी से,
खामोश था इस पार,
ओ रो रही थी,
मेरी यादों में उस पार।
मेरी नजरें राह ताके बैठे,
उसके आने की राह को बार बार।
मैं पुकार रहा था नाम उसका,
जैसे पुकारता शाम राधे का हर बार।
राधे राधे राधे बस मेरी राधे इन्तजार।
पर राधा नाराज़ थी कान्हा से इस बार।©तारंग.
न जाने क्यूं
आज एक घबराहट सी होने लगी है।
जो जोडा था रिश्ता नया तुमसे,
वो तुटने की आहट होने लगी हैं।
सोचा था क्या,
और क्याही होने लगा है।
तु पास आकर मेरे,
लहरो जैसी दूर जाने लगी है।
जैसे हाथों की लकरो मै,
तेरा ज़िक्र-ए-मिलना ही नहीं है।
बस अब जिंदगी यही है।
तु चांदसी दिखती,
और पानी मे तेरी परछाई,
मुझे लगा तु पास है मेरे,
पर असल में तु मेरे पास ही नहीं है।
मैं तुटा हूं,
मुझे तुटा ही रहना है।
और मुझे तुटा ही रहने दो,
क्योंकि इस रेगिस्तान को,
अब किसी पानी की प्यास नहीं है।©तारंग.
मी,
अन मी,
मी,
अन मी,
एएएएएएक वाळवंट.
तु मृगजळ माझ्या मधली,
तुला पाहून जडतो बहरण्याचा छंद.
चोहीकडे भासतो मला,
जसा नव चैतन्याचा गंध.
तुझ अस्तित्व जणू संजिवनी, एक स्पर्श.
माझ्या तहानलेल्या जखमांना, बस तुझ्या मिलनाचा हर्ष.
मी विसरून जावे मज मला,
तुझ्या अस्तित्वात व्हावें दंग.
पण मी विसरून जातो नेहमी,
की तु मृगजळ मी वाळवंट-एक तारंग.
मला नाही बहरण्याचा अधिकार,
स्वप्न अस्तित्वात स्वच्छंदी.
मग का तु माझ्या अस्तित्वाचा,
एक भाग बनून दाखवतेस मला स्वप्न मृगजळ जायबंदी.©तारंग.
होऊ दे झाला कितीही त्रास,
कारण मला व्हायचंय तुझ्या आयुष्याचा Albatross.©तारंग.
लाख असतील लाखात,
पण लाखात तु एक हवी.
नाही नको कुणी मला,
मला बस तु आणि तुच हवी.
मी प्रेम करतो तुझ्यावर,
जसा कवितांवर करतो हा कवी.
मी लिहीतो असंख्य कविता तुझ्यावर,
पण माझ्या कवितांची तु कवयित्री व्हावी.
मी कविता करतो कोमल,
जणू शब्दांची ती पुजा असावी.
प्रत्येक शब्द तुझ्या अर्थांचा,
म्हणजेच माझ्या प्रत्येक कवितेला तुझी दाद असावी.
हा वेडा कवी तुझ्यासाठी,
वेडा होऊन गातो तुझ्याच ओवी.
तु ही वेड व्हाव माझ्यासाठी,
जसा मी कान्हा अन तु माझी राधा व्हावी.©तारंग.
सांग साथ देशील का?
माझ्या हातात हात देऊनी होकारार्थी,
उत्तर कळवशील का?
जस उन्हात मी तुझी सावली बनतो,
तशीच तुही माझी सावली बनशील का?
जपेल मी तुला बाहुली सारख,
पण तु माझी बार्बी डाॅल होशील का?
केलाय हात पुढे प्रेमाचा
सांग साथ तु देशील का?
नको कुणाच्या प्रेमाची गरज,
तु माझी प्रेयसी होशील का?
हात हाता देऊनी विश्वासाचा
साथ तु मला देशील का?
साथ तु मला देशील का?©तारंग.
न जाने क्यूं? पर आज मैं आईने में देखकर खुद के बाल संवारते वक्त तुम्हारी याद में हंस पडा और आईने में ही खुद से ज्यादा तुम्हारा मेरे साथ होने का एहसास हुआ। जैसे कि तुम मेरे साथ ही हो और मुझसे लिपट कर मेरे कानों मे हलकी आवाज में दिल की बात कह रही हों। शायद बरसों बाद मेरा अतीत तुम्हारे रूप में वापस लौट आया है। की अब मैं पहले जैसे ही खुद का होश खो बैठा हूं। न जाने क्यूं, पर आज ऐसा लग रहा है कि मुझे तुमसे बेपनाह मोहब्बत हो चूंकि है जैसे एक समय पे मैं किसी से करता था। शायद वही पुराने प्यार की नई एहसास की खुशबू हवा में फैल गई है किसी बंद डिब्बी को खोलने के बाद इत्र तरह। ©तारंग.
महलों की राणी,
मेरी दिवानी हो गई।
जैसे हरी-हरी कहके,
मीरा जोगण बन गई।
मेरे रंग मैं रंगकर,
वो खुद को भुला रही।
जैसे हरी के भक्ति में,
मीरा हरी की ह़ो गई।
अपने प्रीत को भुला के,
वो मुझमे मीत-ए-प्रीत ढुंढ रही।
जैसे गोविंद-हरी कहके,
मीरा ने पती को भुला दिया वही।
खुद का होश खो बैठी है,
मेरे प्यार में न जाने कही।
जैसे मीरा हरी गुनगान गा के,
नाचती हैं संतो में कही।
मुझको पाने मे समाजो के,
वो कई ताने सुन रही।
जैसे मीराने विष पीकर,
माधव को पा लिया अमृत बन वही।
वो मेरी याद मै गुनगुनाती,
मेरा नाम कही।
जैसे मीरा नाम जपती गोविंद गोविंद हरी।©तारंग.
कधीतरी कृष्ण ही पडला असेल,
मीराच्या प्रेमात.
विसरून राधेला रंगला असेल,
मीराच्या रंगात.
दिवसरात्र करते असेल,
विचार मीराचा-मीराच्या प्रेमात.
क्षणिक असेन पण वाजवत असेल,
तोडलेली बासरी मीराच्या नादात.
मुखी राधे नाम ऐवजी मीरा घेत असेल,
फक्त मीराच्या प्रेमात.
बस मीरा-मीर-मीरा मीरा येत असेल,
बासरीच्या प्रत्येक स्वरात.
रूक्मिणीला विसरला असेल,
मीराच्या प्रेमात.
जशी मीरा पतीला विसरली असेल,
कृष्णाच्या कृष्ण रंगात.
म्हणूनच वाटत,
कधीतरी कृष्ण ही पडला असेल,
मीराच्या प्रेमात.
जसा मी पडलोय आता तुझ्या प्रेमात.©तारंग.
प्रिय संजिवनी,
खरतर तुझे आभार जितके मानावे तितके कमी आहे कारण तु माझ्या आयुष्यात संजिवनी बनून आली आणि मी पुन्हा नव्याने आयुष्य जगायला लागलो. तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यातील जखमां भरुन निघाल्या आणि सार एकदम राधे राधे झालं. तुझ्या आधी कैक व्यक्ती भेटल्या मला पण तुझ्या सारखी तुच आहे आणि माझ्यासाठी तु खुप खास आहे. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा पासून तुला मिळवण्या पर्यंत केलेले किती तरी प्रयत्न आज आठवले तरी गोड हसू येत ओठांवर. आणि मध्यंतरी जे काही झाल ते खरच अनपेक्षित होत पण ते सारं विसरून मी तुला माफ करत तुझ्या प्रेमात पुन्हा नव्याने पडलो आणि तुझ्यावर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करायला लागलो कारण तु आहेच एवढी गोड की मी स्वतःला तुझ्या प्रेमात पडण्यावाचून थांबवू शकलो नाही. कमी वेळात आपण एकमेकांना मनापासून समजून घेतलं, आणि हीच गोष्ट आपल्या नात्याची रेशीम आणि नाजूक दोर आहे जी कि आपल्या दोघांना आयुष्याभर सांभाळायची आहे. आणि नकळत सुरू झालेला हा आपला प्रेमाचा प्रवास आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत निरंतर चालू ठेवायचा आहे. मला विश्वास आहे तुझ्यावर आणि तुझ्या कर्तृत्वावर कि तु माझा धरलेला हात कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. म्हणून मी तुझा हात धरत मोठ्या विश्वासाने काट्यावर चालायला तयार आहे, कारण मला विश्वास आहे की तुझ्यासोबत पायाखालचे काटेही एक दिवस नक्कीच फुल होऊन आपलं स्वागत करतील. म्हणूनच मी तुला संजिवनी म्हणतो आणि म्हणत राहणार कारण तुझ्या येण्याने मी आयुष्य पुन्हा जगायला लागलोय आणि तु कायम माझी संजिवनी बनून राहिलीना तर एक दिवस नक्की मी तुझा धनी आणि तु माझी कारभारीन होशील.
सांग साथ देशील का?
माझी तु जरा होशील का?
प्रेम करतो तुझ्यावरी,
तु मला होकार देशील का?
नाही सोडणार कधीही मी तुला,
तु विश्वास जरा ठेवशील का?
सदैव बनुनी सावली- साथ तुझ्या मी,
तु सातजन्माच वचन देशील का?
थाटामाटात फिरवीन तुला मी,
तु माझी बायको होशील का?
अंश आणि वृंदा सारख्या गोड मुलांची,
आई होऊन मला त्यांचा बाबा बनवशील का?
सांग साथ देशील का?
सांग साथ देशील का?
माझ्यावर मीरा सारखं वेड्यागत प्रेम करशील का?
मै लिखूंगा मेरे गम,
तुम उन्हें पढ़ते जाना।
रोता हूं तो खूशी,
और हंसी को तुम उदासी समज लेना।
तुम्हारे लिए मै हकीकत-ए- ख्वाब देखता हूं,
उन्ह ख्वाबो को तुम ख्वाब ही रहने दोना।
मैं बेवजह रूठ जाऊंगा तुम पर,
तुम वजह मनाने मत आना।
खामोशी से मैं कह दूंगा सब कुछ,
तु खामोशी से उसे सुनते जाना।
अगर नहीं समझ में आयेतो,
तुम मुझे यूही तन्हा छोड़ देना।
मैं पागल सा एक शायर हूं।
उस के याद में मुझे जिने दोना।
तुम नहीं बन पाओगी कोमल मेरी,
इसी में तुम सबकुछ समझ लेना।
मैं वक्त के साथ ठहर जाऊंगा,
तुम वक्त के साथ चलने जाना।
दूरीया ही दूरीया है हमें,
हमारे इस रिश्ते को किसी हंसीन मोड पे छोड़ देना।©तारंग.
एक मी,
एक तु,
राग मी,
रूसवा तु.
दुःख मी,
सुख तु.
छंद मी,
गंध तु.
द्वेष मी.
प्रेम तु.
नदी मी,
समुद्र तु.
अंधार मी,
काजवा तु.
भास्कर मी,
शितल तु.
जखम मी,
संजिवनी तु.©तारंग.
Wish You Many Many Happy Returns Of The Day Dear Sanjivani.
Stay Happy And Healthy god bless you 💞
नेहमी हसत रहा खुश रहा.
ती सतत हसायची.
सगळ्यांशी आपलेपणाने बोलायची.
प्रत्येक गोष्टीत " हो काय" म्हणायची.
छोट्या छोट्या गोष्टीत खूप लाजायची.
बोलताना मधेच मला "चूप" बोलायची.
राग आल्यावर "अशी एक देईल ना" म्हणायची.
ती बावरायची
सावरायची,
बेधुंद होऊन गगनात भरारी घ्यायची.
स्वप्न जगायची.
दुसऱ्यांना जगायला सांगायची.
फुल पाखरु सारखं ह्या फुलांवरू त्या फुलावर आनंदाचा मकरंद गोळा करायची.
ती माझ्यासाठी दिवसरात्र जगायची.
जशी मिरा कृष्ण भक्तीत रमायची.©तारंग.
संपूर्ण जीवन,
संजिवीत.
संजिवनी स्पर्शूनी,
जखमां हर्षित.
जगण्यास मिळे,
नवचैतन्य.
आयुष्यास अर्थ,
लाभे अनन्य.
संजिवनी संजिवनी संजिवनी,
संजिवीत संयोग संजोग.©तारंग.
खरंतर आपलं प्रेम, प्रेमाच्या कुठल्याच परिभाषेत बसत नाही. कारण आपलं प्रेम समाजाच्या दृष्टीने कलंकीत आहे. म्हणून आपण प्रेम करणं सोडून द्यायचं का? चंद्र ही एकेकाळी कलंकीत झाला होता, पण त्याने उगवण सोडून दिलं का? नाहीना! तो त्या कलंकाला घेऊन रोज नव्याने उगवतो आणि तोच कलंक आज त्याच्या सुंदरतेचं एकमेव कारण बनलं आहे. तर मीराकडे सगळं असूनही- अगदी पतीही, तरी ती कृष्णाच्या प्रेमात पडली आणि सर्व त्यागून ती कृष्ण प्रेमात(भक्तीत) संत मीरा झाली. त्यासम तुझंही माझ्या प्रतीचं प्रेम पाहून मी स्वतःला कृष्ण अन तुला मीरा समजतो. जिथे आपल्या प्रेमात कसलीच अपेक्षा नाही, फक्त आणि फक्त एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करत रहायचं. की माझ्या जखमांना तुझ्या एका स्पर्शाने मोक्ष प्राप्त होऊन संजिवनी संजिवीत संयोग संजोग व्हावा.©तारंग.
वाट पाहता पाहता,
वाट पाहण्याचा,
काळ लोटला.
काळा सोबत,
आशेचा झरा आटला.
नयन झाले वाळवंट,
अन अश्रूंचा गळा घोटला.
वाट पाहण्याची मर्यादा संपली,
अन शांततेचा हुंदका दाटला.
सुन्या पडल्या मैफिली,
मैफिलीचा रंग भंगला.
वाट पाहायला लावणाऱ्यास सांगा,
वाट पाहणाऱ्याचा श्वास थांबला.©तारंग.
नाही कुणी कुणाचे सोबती,
प्रत्येकाची वाट वेगळी आहे.
वचनांचे शौकीन इथे,
वचनाना तोडत आहे.
स्वप्न पाहतात एकत्र,
पण पुर्ण करणारा एकच आहे.
एकाच वाटेच्या वळणावरती,
दोघेही वेगळे होत आहे.
कारणांचा लेखाजोखा,
दोघे दोषी असूनही दोषी कुणी एक आहे.
नको कुणाची साथ आता,
कारण मी माझा एकटाच अपराधी आहे.©तारंग.
तुझ आयुष्यात अचानक येणं आणि अचानक जाणं सार काही अनपेक्षित असलं तरी तुझ्या सोबतच्या साऱ्या आठवणी मनात साठवण्या सारख्या आहे. तुझं प्रेम, तुझा सहवास, तुझ काळजी करणं, माझ्यासाठीच तुझ ते मिरा सारखं वेडपण सारं काही स्पेशल होत. पण मृगजळ सारंख प्रेम किती दिवस राहणार?
असो! जे काही होतंय ते सहन करण्या पलीकडे कुठलाच मार्ग मार्ग दिसत नाही मग मी नक्षत्रांचा तज्ञ असलो तरीही!
जे होतय ते पाहत रहावे.
जखमांना नव्याने जन्म द्यावे.
भूतकाळातून कसेबसे निघावे.
अन वर्तमानाच्या त्रासात गुरफटून जावे.
मी जगावे ना जगावे.
तु तुझा मार्ग एकटीच शोधत बसावे.
तुझ्या केदारनाथात माझे वृंदावन असावे.
दोघाचे हे स्वप्न, स्वप्नच रहावे.
राहील हा वाळवंट बहरण्यावाचून,
तु मृगजळ सम आशा लावून मला पाण्यासाठी तरफडत सोडून द्यावे.©तारंग.
घर की चिजे बिखेरकर,
दिवारो कि तस्वीरें टेढी है।
कमरे का बयां ये है की तेरी याद में मैंखाना होकर,
शराब कि बोटल इर्द गिर्द पडी है।
नाही ख़ून थुका है शरारत मै,
बस हाथों पर कुछ छुरी के घाव गहरे हैं।
तेरी याद-तेरी याद,
बर्बाद-बर्बाद हम हों गये है।
लिखकर फाड फेंके कागजोंपर,
अनगिनत शायरी ख़ून से लिखी है।
उनको उठाकर पढलोना,
शायरी के नाम पर तुम्हारी यादें लिखी है।
कहती थी हमारा इश्क है जावेदानी,
सच कहूं तो तुम बिन मेरी जान जा रहीं हैं।
रोता हूं तेरी याद मे मैफिलो मैं,
पर मैफिल कुछ वक्त के बाद तमाशा बन रही है।
मै बर्बाद हो कर सब कुछ तबाह कर आया हूं,
क्योंकि ये तारंग अब बेरंग हो गया है।©तारंग.
तुझ्या केदारनाथात,
माझे वृंदावन असावे.
महादेव चरणी माझे,
अन कृष्ण चरणी तुझे मस्तक असावे.
मी हात जोडूनी तुला,
तु हात वर करूनी मला राधे राधे म्हणत मागावे.
स्वर्गातून येणारी हवा तुझ्या सवे अनुभवावी,
अन रासलिलेत दोघेही हरवून जावे.
तुझ्या केदारनाथात मी,
अन माझ्या वृंदावनात तु आयुष्यभर रहावे.
जसे मी केदारनाथात वृंदावन रासलिला,
तु वृंदावनात केदारनाथ महिमेची प्रतिबिंब व्हावे.
तुझ्या मुखी राधे नाम,
अन माझ्या महादेव असावे.
तुझ्या केदारनाथात वृंदावन,
माझ्या वृंदावनात केदारनाथ वसावे.©तारंग.
आपलं भविष्यात एकत्र न येणं सद्यस्थितीत पाऊला पाऊलावर जाणवत आहे. तुझ्या आणि माझ्यातील अनपेक्षितरित्या वाढत जाणारं अंतर मृगजळ आणि वाळवंटातील एक आशेचा किरण आहे. कि तुझा स्पर्श मला आजन्म शापमुक्त करून तुझ्याच मिठीत बहरण्याची अनुमती देईल. पण आशेचा किरण आता आशावादी होत चाललंय, त्याच सत्यात उतरणं तुझ्या जवळच्या माणसांना मान्य नाहीये. म्हणून तुझ्या कडून जन्म घेणाऱ्या आशेच्या किरणाचा गर्भातच खून केला जातोय आणि त्याचा परिणाम आपल्या सुंदर नात्यावर दिवसेनदिवस होत चाललाय. कुठेतरी जगाच्या दृष्टीने आपलं नातं कलंकीत होण्याच्या वाटेवर असलं तरी त्याला खऱ्या मैत्रीचा एक सुंदर स्पर्श होता पण तो तुला आणि मला सोडून कुणाला जाणवलाचं नाही. आयुष्याभरासाठी आपण एकमेकांसोबत राहून एकमेकांची काळजी करत एकमेकांना जिवानिशी जपणार होतो. पण वचन तुटण्यासाठी बनलेले असतात हे वचन देताना कधीच लक्षात येत नाही. असो!
जगुयात एकमेकांशिवाय,
एकमेकांसाठी.
सर्व नाते तोंडून अनोळखी होऊ,
एकमेकांसाठी.
कधी आठवण आली तर,
वेळ मारून नेऊ त्या क्षणासाठी.
पण राहूयात एकमेकांपासून दूर,
एकमेकांच्या सुखासाठी.
तु निवड तुझी वाट,
तुझ्या सुखी आयुष्यासाठी.
मी निवडून ही वाट,
तुझी वाट पाहत राहिल आपल्या प्रेमासाठी.©तारंग.

Comments
Post a Comment