हल्ली मी शोधतो मला अधूनमधून कविता मध्ये.

 


हल्ली मी शोधतो मला

अधूनमधून कविता मध्ये.

पण दिसतो ही तसा मी कुठे तिच्यामध्ये.

हरवलेला मी आणि हरवलेली ती,

असा सहजा सहजी नाही भेटत मी तिच्यामध्ये.

मग तरीही का शोधतोय मी मला तिच्यामध्ये?

ह्या मुर्खपणाला, वेडापणा म्हणाव की प्रेम?

की अजून काही?

पण एक वेगळच सुख मिळत,

मला स्वताला तिच्यात शोधण्यामध्ये.

तिला वाचताना,

अनुभवताना,

स्पर्श करताना,

यमकांच्या यमकांमध्ये, अर्थांचे अर्थ उलघडताना

जणू मी तिच्या मिठीत असल्याचा भास होतो.

पण हा भास ही क्षणीक असल्याचा भास होतो कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये.

आणि मी तिथेच कुठेतरी पुन्हा हरवतो स्वताला कवितेत शोधण्यामध्ये.©तारंग.

Comments

Popular posts from this blog

निळावंती.

मला सोडून नाही जाणार ना तु?

अंश आणि वृंदा The Death Before Born...