शरीरावरील कोड.
सारं काही क्षणांत बदललं कारण अचानक आलेलं तिच्या शरीरावरील कोड,तिच्यासाठी एक कोड बनलं. इतरांसमवेत घरच्यांनीही तिच्या कडे तिरस्कार नजरेने पाहण्यात सुरूवात केली. एका आजाराला देवीचा कोप म्हणून लेबल लावण्यात आल. पहिल्यांदा चंद्राला स्वताला पाण्यात (आरश्यात) न्याहाळताना लाज वाटू लागली.चंद्राला त्याच्या हक्काचे डाग सोडून अनपेक्षित डाग नको होते कारण त्या डागामुळे त्याची ओळख समाजात कुरुप म्हणून झाली आणि तो चांदण्या पासून दूरावला गेला. सतत घरच्यांचे टोमणे आणि वाढत्या वयानुसार तिच्यासमवेत घरच्यांचीही झोप उडाली. कोण लग्न करेल हा गहन प्रश्नान तिच्या माथी कलंक म्हणून लागला.पण हे कोड, कोड जरी असलं तरी तिच्या आयुष्यात येणाऱ्या नी तो एक त्वचेचा आजार म्हणून स्वीकारावं नाही की एक अंधश्रद्धा.©तारंग.
तिच्या अंगावरील कोड,
एक कोड होत.
शारिरीक नाही पण,
मानसिकतेच एक ओझ होत.
अचानक भेटलेल हे दान,
आयुष्याभरचा एक गोंदनं होतं.
सावळ्या शरीरावरील पांढरे डाग,
आकाशातील एक चांदणं होतं.
नाही प्रश्न सुंदरतेचा,
पण कुरूपतेच एक टोमण होतं.
वाढत्या वयानुसार हा कलंक,
अन एक घुसमटलेलं जगणं होत.©तारंग.
Comments
Post a Comment