Posts

प्रिय रुक्मिणी.

Image
 प्रिय रुक्मिणी,       येतेस आयुष्यात माझ्या? तर जरा थांब! येण्या आधी वाटेत राधा आणि मीरा ही उभी आहे त्यांच्याशी तुझं हितगुज साध. कारण तु राधाची जागा नाही घेऊ शकत आणि मीराची जागा मी तुला नाही देऊ शकत. आता तु ठरव तुला काय करायचंय ते. पण हा एक मात्र नक्की सांगेन, तुला ह्या दोघींच्या अगदी मधोमध एक अर्धांगिनी नावाची जी सुंदर जागा आहे तिथे तुला राहाव लागले. पण तिथे तुला नाव लौकीक मिळणार नाही किंवा माझ्या नावा सोबत तुझ्या नावाचा उल्लेख ही होणार नाही कारण ते फक्त राधा आणि मीरालाच माहित आहे. बघ मान्य असेल तर हे सगळं सहन करावं लागेल अन्यथा ह्या कान्हाला समजायला तुला जरा वेळ लागेल. मला मान्य आहे तुझ माझ्या आयुष्यातील हक्काचं अस्तित्व, मी ते नाकारलं नाही आणि नाकारतही नाही. पण राधा श्वास तर मीरा अस्तित्व आहे माझं त्यामुळे त्यांना ह्या जन्मी विसरनं शक्य नाही मला. तुला जर माझं व्हायचं असेल ना? तर तु तुझ्या अस्तित्वाचा काही अंशी भाग माझ्यासाठी वाहून दे, तेव्हाच लोक तुला माझी रुक्मिणी म्हणून ओळखतील. पण ते वाटतं तितकं सोपं नाहीये त्यासाठी तुला माझ्या राधाची आणि मीराची खरी कहानी जाणून...

मला सोडून नाही जाणार ना तु?

Image
  कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर करण नी पाठीवरची बॅग रागात फेकली आणि एखाद्या लहान मुला सारखा सोफ्यावर आडवा झाला. ते पाहून आई चिडली आणि करणला ओरडायला लागली पण करण नी ते दुर्लक्ष केल आणि निपचित पडून राहिला. खरंतर आज करणच्या चेहऱ्यावरील शांतता खूप काही सांगत होती. करणचे दिवसेंदिवस बदलत जाणारे हावभाव आईच्या चिंतेचे कारण बनत चालले आहे. आई : काय रे काय झालं आज? करण: काही नाही ( रागाच्या स्वरात) आई : काही नाही झालं मग बॅग का फेकली. करण : काही नाही झालं आणि मला वेड लागलंय म्हणून बॅग फेकली मी. बसं ह्या पुढे मला काही विचारू नको अस म्हणत करण नी आईच बोलणं टाळलं आणि रागारागात बाथरूम मध्ये गेला पण बाथरूम मध्ये गेल्यावर तो रडत स्वतःशीच बडबडायला लागला. यार करण काय चुकतं माझं, दरवेळेस जो येतो माझ्या भावनांशी खेळतो आणि निघून जातो, माझा कुणीच का विचार करत नाही. मी प्रत्येक नातं विश्वासाने आणि प्रेमाने जोडत आलोय पण सरते शेवटी का म्हणून माझ्या वाटेला इतका त्रास यावा? माझा चांगुलपणा ह्या साऱ्याला कारणीभूत आहे का? काय करू कळत नाहीये मला. हे देवा नको रे इतका अंत पाहून माझ्या सहनशीलतेचा, बसं झालं आता थांब...

एक संध्याकाळ.

Image
  नुकताच मित्राच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी आलेला करण आईशी गप्पा मारत दिवसभर झालेल्या गमती सांंगत मोबाईल चाळत होता. तेवढ्यात मावशीचा करणला फोन आला आणि मावशी करणची मस्करी करत म्हणाली तु कधी करतो लग्न किती दिवस मित्रांचे साखरपुडे खात फिरणार? त्यावर करण उत्तरला, करूना तुम्ही बघा की चांगली मुलगी उद्या मंडपात उभा राहतो कि नाही बघा अस म्हणत करण नी हसत फोन ठेवला आणि परत मोबाईल चाळत बसला. तेवढ्यात करणला काव्याचा मेसेज आला. काव्या : कुठे आहेस तु? करण : घरी आहे मी! काव्या : माझ्यासोबत येतो का डाॅक्टर कडे चालली आहे. करण : हो येतो पण कुठे भेटू ? काव्या : तु सांगना, कि थेट डाॅक्टरकडे येता? करण : नाही नाही थांब, तु संभाजी चौकात उतर तिथून आपण सोबत जाऊ डाॅक्टरकडे. काव्या : ठिक आहे पण लवकर निघ बस येईल आता. करण : हो ठिक आहे मी आवरतो पटकन आणि येतो. अस म्हणत करण आवरायला लागला संध्याकाळची वेळ असल्या कारणाने वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. करणला आवरताना पाहून आई बोलली आता कुठे निघाला तु? आताच बाहेरून घरात आला होताना मग कुठे? पण करण नी आईच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता आवरत राहिला. आणि मी...

सर्व स्त्री सारख्या असतात?

 सर्व पुरुष सारखेच असतात अस चूकिच वक्तव्य करणाऱ्या महिलांच्या वागण्याकडे पाहून म्हणायला हरकत नाही कि सर्व महिला सारख्याच असतात. जिथे स्त्रीचा आदर केला जातो तिथेच अनादरही कैक पटीने का केला जातो हे कळाल्यावर समजत की समाजात स्त्रीला काचेच भांड का म्हणतात आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असतो ते. कटू आहे पण सत्य आहे.©तारंग.

निळावंती.

 सगळेजण विचारतात मला माझ्या लिखाना बद्दल. कुणासाठी लिहीतो, तिच्या नावा सोबत तुझ दुःख सांग तर. पण सांगण्या सारख नाही, दुःख अन तिच नाव. जस निळावंती मधला तिचा भाव. मी वाचत गेलो तिला जणू ती आहे तो ग्रंथ. मला वाटलं मी तिला वाचून होईल श्रीमंत. जस जस मी तिला वाचत गेलो. तिच्या हावभावची भाषा मी जाणत गेलो. पण कुठे शिकलो नव्हतो मी तिची भाषा. मला सार कळत गेलं, कारण मनी होती एक आशा. मी हळूहळू तिच्यासाठी वेडा होत गेलो. जणू ती गुप्त धन, अन‌ मी तिचा लालची झालो. पण मी विसरलो होतो ती आहे निळावंती ग्रंथ. तिला वाचताना झाली माझ्या श्वासाची गती संथ. नाही सांगू शकत तिच्या बद्दल याची मला खंत. परत विचारू नका ह्या संताचा कोणता पंथ.©तारंग.

रूप.

 रुप तुझ लावण्याचं, जणू इंद्राची तु अप्सरा. शृंगार करते ऐसा, पाहून होतो चंद्र लाजिरा. चांदण्या डौले तुज कानात होऊन झुमके, जसा क्षण नक्षत्रांचा साजिरा. तुझ्या ओठांवर लाली सजते, जणू सुर्यास्ताचा सुर्य गोजिरा. तुझ्या नयनांच्या पापण्यांना, जसा काजळाचा किनारा. तुझ्या नाकाची बारीक मुरणी, जणू चंद्राच्या रूपाला डागाचा सहारा.©तारंग.

शरीरावरील कोड.

  सारं काही क्षणांत बदललं कारण अचानक आलेलं तिच्या शरीरावरील कोड,तिच्यासाठी एक कोड बनलं. इतरांसमवेत घरच्यांनीही तिच्या कडे तिरस्कार नजरेने पाहण्यात सुरूवात केली. एका आजाराला देवीचा‌‌ कोप म्हणून लेबल लावण्यात आल. पहिल्यांदा चंद्राला स्वताला पाण्यात (आरश्यात) न्याहाळताना लाज वाटू लागली‌.चंद्राला त्याच्या हक्काचे डाग सोडून अनपेक्षित डाग नको होते कारण त्या डागामुळे त्याची ओळख समाजात कुरुप म्हणून झाली आणि तो चांदण्या पासून दूरावला गेला. सतत घरच्यांचे टोमणे आणि वाढत्या वयानुसार तिच्यासमवेत घरच्यांचीही झोप उडाली. कोण लग्न करेल हा गहन प्रश्नान तिच्या माथी कलंक म्हणून लागला.पण हे कोड, कोड जरी असलं तरी तिच्या आयुष्यात येणाऱ्या नी तो एक त्वचेचा आजार म्हणून स्वीकारावं नाही की एक अंधश्रद्धा.©तारंग. तिच्या अंगावरील कोड, एक कोड होत. शारिरीक नाही पण, मानसिकतेच एक ओझ होत. अचानक भेटलेल हे दान, आयुष्याभरचा एक गोंदनं होतं. सावळ्या शरीरावरील पांढरे डाग, आकाशातील एक चांदणं होतं. नाही प्रश्न सुंदरतेचा, पण कुरूपतेच एक टोमण होतं. वाढत्या वयानुसार हा कलंक, अन एक घुसमटलेलं जगणं होत.©तारंग.