Posts

Showing posts from January, 2023

मला सोडून नाही जाणार ना तु?

Image
  कामावरून संध्याकाळी घरी आल्यावर करण नी पाठीवरची बॅग रागात फेकली आणि एखाद्या लहान मुला सारखा सोफ्यावर आडवा झाला. ते पाहून आई चिडली आणि करणला ओरडायला लागली पण करण नी ते दुर्लक्ष केल आणि निपचित पडून राहिला. खरंतर आज करणच्या चेहऱ्यावरील शांतता खूप काही सांगत होती. करणचे दिवसेंदिवस बदलत जाणारे हावभाव आईच्या चिंतेचे कारण बनत चालले आहे. आई : काय रे काय झालं आज? करण: काही नाही ( रागाच्या स्वरात) आई : काही नाही झालं मग बॅग का फेकली. करण : काही नाही झालं आणि मला वेड लागलंय म्हणून बॅग फेकली मी. बसं ह्या पुढे मला काही विचारू नको अस म्हणत करण नी आईच बोलणं टाळलं आणि रागारागात बाथरूम मध्ये गेला पण बाथरूम मध्ये गेल्यावर तो रडत स्वतःशीच बडबडायला लागला. यार करण काय चुकतं माझं, दरवेळेस जो येतो माझ्या भावनांशी खेळतो आणि निघून जातो, माझा कुणीच का विचार करत नाही. मी प्रत्येक नातं विश्वासाने आणि प्रेमाने जोडत आलोय पण सरते शेवटी का म्हणून माझ्या वाटेला इतका त्रास यावा? माझा चांगुलपणा ह्या साऱ्याला कारणीभूत आहे का? काय करू कळत नाहीये मला. हे देवा नको रे इतका अंत पाहून माझ्या सहनशीलतेचा, बसं झालं आता थांब...

एक संध्याकाळ.

Image
  नुकताच मित्राच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून घरी आलेला करण आईशी गप्पा मारत दिवसभर झालेल्या गमती सांंगत मोबाईल चाळत होता. तेवढ्यात मावशीचा करणला फोन आला आणि मावशी करणची मस्करी करत म्हणाली तु कधी करतो लग्न किती दिवस मित्रांचे साखरपुडे खात फिरणार? त्यावर करण उत्तरला, करूना तुम्ही बघा की चांगली मुलगी उद्या मंडपात उभा राहतो कि नाही बघा अस म्हणत करण नी हसत फोन ठेवला आणि परत मोबाईल चाळत बसला. तेवढ्यात करणला काव्याचा मेसेज आला. काव्या : कुठे आहेस तु? करण : घरी आहे मी! काव्या : माझ्यासोबत येतो का डाॅक्टर कडे चालली आहे. करण : हो येतो पण कुठे भेटू ? काव्या : तु सांगना, कि थेट डाॅक्टरकडे येता? करण : नाही नाही थांब, तु संभाजी चौकात उतर तिथून आपण सोबत जाऊ डाॅक्टरकडे. काव्या : ठिक आहे पण लवकर निघ बस येईल आता. करण : हो ठिक आहे मी आवरतो पटकन आणि येतो. अस म्हणत करण आवरायला लागला संध्याकाळची वेळ असल्या कारणाने वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. करणला आवरताना पाहून आई बोलली आता कुठे निघाला तु? आताच बाहेरून घरात आला होताना मग कुठे? पण करण नी आईच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता आवरत राहिला. आणि मी...

सर्व स्त्री सारख्या असतात?

 सर्व पुरुष सारखेच असतात अस चूकिच वक्तव्य करणाऱ्या महिलांच्या वागण्याकडे पाहून म्हणायला हरकत नाही कि सर्व महिला सारख्याच असतात. जिथे स्त्रीचा आदर केला जातो तिथेच अनादरही कैक पटीने का केला जातो हे कळाल्यावर समजत की समाजात स्त्रीला काचेच भांड का म्हणतात आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असतो ते. कटू आहे पण सत्य आहे.©तारंग.

निळावंती.

 सगळेजण विचारतात मला माझ्या लिखाना बद्दल. कुणासाठी लिहीतो, तिच्या नावा सोबत तुझ दुःख सांग तर. पण सांगण्या सारख नाही, दुःख अन तिच नाव. जस निळावंती मधला तिचा भाव. मी वाचत गेलो तिला जणू ती आहे तो ग्रंथ. मला वाटलं मी तिला वाचून होईल श्रीमंत. जस जस मी तिला वाचत गेलो. तिच्या हावभावची भाषा मी जाणत गेलो. पण कुठे शिकलो नव्हतो मी तिची भाषा. मला सार कळत गेलं, कारण मनी होती एक आशा. मी हळूहळू तिच्यासाठी वेडा होत गेलो. जणू ती गुप्त धन, अन‌ मी तिचा लालची झालो. पण मी विसरलो होतो ती आहे निळावंती ग्रंथ. तिला वाचताना झाली माझ्या श्वासाची गती संथ. नाही सांगू शकत तिच्या बद्दल याची मला खंत. परत विचारू नका ह्या संताचा कोणता पंथ.©तारंग.

रूप.

 रुप तुझ लावण्याचं, जणू इंद्राची तु अप्सरा. शृंगार करते ऐसा, पाहून होतो चंद्र लाजिरा. चांदण्या डौले तुज कानात होऊन झुमके, जसा क्षण नक्षत्रांचा साजिरा. तुझ्या ओठांवर लाली सजते, जणू सुर्यास्ताचा सुर्य गोजिरा. तुझ्या नयनांच्या पापण्यांना, जसा काजळाचा किनारा. तुझ्या नाकाची बारीक मुरणी, जणू चंद्राच्या रूपाला डागाचा सहारा.©तारंग.

शरीरावरील कोड.

  सारं काही क्षणांत बदललं कारण अचानक आलेलं तिच्या शरीरावरील कोड,तिच्यासाठी एक कोड बनलं. इतरांसमवेत घरच्यांनीही तिच्या कडे तिरस्कार नजरेने पाहण्यात सुरूवात केली. एका आजाराला देवीचा‌‌ कोप म्हणून लेबल लावण्यात आल. पहिल्यांदा चंद्राला स्वताला पाण्यात (आरश्यात) न्याहाळताना लाज वाटू लागली‌.चंद्राला त्याच्या हक्काचे डाग सोडून अनपेक्षित डाग नको होते कारण त्या डागामुळे त्याची ओळख समाजात कुरुप म्हणून झाली आणि तो चांदण्या पासून दूरावला गेला. सतत घरच्यांचे टोमणे आणि वाढत्या वयानुसार तिच्यासमवेत घरच्यांचीही झोप उडाली. कोण लग्न करेल हा गहन प्रश्नान तिच्या माथी कलंक म्हणून लागला.पण हे कोड, कोड जरी असलं तरी तिच्या आयुष्यात येणाऱ्या नी तो एक त्वचेचा आजार म्हणून स्वीकारावं नाही की एक अंधश्रद्धा.©तारंग. तिच्या अंगावरील कोड, एक कोड होत. शारिरीक नाही पण, मानसिकतेच एक ओझ होत. अचानक भेटलेल हे दान, आयुष्याभरचा एक गोंदनं होतं. सावळ्या शरीरावरील पांढरे डाग, आकाशातील एक चांदणं होतं. नाही प्रश्न सुंदरतेचा, पण कुरूपतेच एक टोमण होतं. वाढत्या वयानुसार हा कलंक, अन एक घुसमटलेलं जगणं होत.©तारंग.

कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही.

 कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही किंवा त्या व्यक्ती शिवाय आपण जगू शकत नाही आणि ती व्यक्ती आयुष्यात सोबत नसेल तर मरून जाईल, ह्या सारख्या मुर्खपणाच्या गोष्टी आपण एका प्रसंगी म्हणतो व करत असतो. पण एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमचं सर्वस्व होऊ शकत नाही( श्वास, प्राण, हृदयाची धडधड वगैरे वगैरे) त्या फक्त म्हणायच्या गोष्टी किंवा सवयी असतात. कारण पाचवीला सटवी तुमच नशीब तिच्या हाताने लिहून तुमच जीवन-मृत्यू ठरवत असते. तर तुम्ही जीवाचा कितीही आटापिटा केला तरीही तुम्हाला तुमच विधिलिखित मरण येऊ पर्यंत जगावं लागेल.(सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका) मी जगू शकत नाही त्या व्यक्ती शिवाय हे रडगाणं कुणाकडे गात बसू नका, उगाचच हसू होईल. मोलाचं आयुष्य आहे आनंदाने जगा. काही सवयी त्रासदायक असतात पण सुटल्यावर मोक्ष प्राप्तीचा अनुभव देतात.©तारंग.

चुरघळलेली कविता.

  मज चुरघळलेल्या कवितेतून, तुझ आठवणींचा गंध येतो. जैसे चुरघळलेल्या फुलामधून, सुगंध दरवळतो. लेखणी मुखी नाम तुझ, कागदावर जप-नृत्य होतो. जैसे वृंदावनी भक्त, राधे-राधे म्हणसी नृत्य करतो. भाव कवितेला तुझा, तुझाच कवितेला शब्दानु स्पर्श होतो. जैसे सुकलेल्या वृक्षाला, वसंत संपूर्ण संजिवीत करतो. प्रत्येक कवितेत नाव तुझ, प्रत्येक कवितेला तुझा अर्थ प्राप्त होतो जैसे हरी भक्तीत प्रत्येक भक्त, राधे-राधे नाम जपतो. तुच तु, तुच श्वास, तुच ध्यास तुच जगण्याची एक आस,  तुच कोमल "कोमल" एक स्पर्श, तरसलो मी, तरसत राहणार आयुष्यभर तुझ्या एका स्पर्शास.©तारंग.

आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा.

  आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा. येणारे येत राहतील, जाणारे जात राहतील. वर्ष सरत राहतील कॅलेंडर पलटत राहतील. व्यक्ती म्हणून चांगले रहा, कुणाला चारित्र्याचे दाखले देत बसू नका. ज्या व्यक्तीमुळे दुखावले गेले तिच्या बद्दल द्वेष बाळगू नका, प्रत्येकाला माफ करत चला. शांत रहा, संयम बाळगा. आयुष्य खुप सुंदर आहे पण सोबतच्या व्यक्ती चांगल्या निवडा. सर्व सुरळीत होईल फक्त मनी करूणा प्रेम आणि वात्सल्याची भावना ठेवा. बाकी राधे राधे.©तारंग.

हल्ली मी शोधतो मला अधूनमधून कविता मध्ये.

  हल्ली मी शोधतो मला अधूनमधून कविता मध्ये. पण दिसतो ही तसा मी कुठे तिच्यामध्ये. हरवलेला मी आणि हरवलेली ती, असा सहजा सहजी नाही भेटत मी तिच्यामध्ये. मग तरीही का शोधतोय मी मला तिच्यामध्ये? ह्या मुर्खपणाला, वेडापणा म्हणाव की प्रेम? की अजून काही? पण एक वेगळच सुख मिळत, मला स्वताला तिच्यात शोधण्यामध्ये. तिला वाचताना, अनुभवताना, स्पर्श करताना, यमकांच्या यमकांमध्ये, अर्थांचे अर्थ उलघडताना जणू मी तिच्या मिठीत असल्याचा भास होतो. पण हा भास ही क्षणीक असल्याचा भास होतो कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये. आणि मी तिथेच कुठेतरी पुन्हा हरवतो स्वताला कवितेत शोधण्यामध्ये.©तारंग.

|| संजिवनी संजिवीत संयोग संजोग ||

Image
 दि.०९.०७.२०२२ ते ३१.१२.२०२२ हल्ली मी कुणासाठी कविता लिहीत नाही आणि कवितेतही कुणाला गुंफत नाही. पण गेल्या पाच सहा दिवसांपासून का? माहित नाही पण राहून राहून सारखं वाटतं की तुझ्या प्रती माझ्या भावना लेखणी द्वारे कवितेतून तुला कळाव्यात म्हणूनच आज तुझ्यासाठी लिहितोय. खरतर तुला पाहता क्षणी तु मनात भरली होती आणि हा ते चित्रपटात दाखवतात तुझे देखते ही दिल के तार छिड गए तशी इथे काय भानगड नाही कारण तुझा साधेपणाच तुला इतरांपासून वेगळा करतो आणि मला भावतोही त्यामुळेच तु त्या साधेपणाला कायम जपशील, जपशील ना? आणि तुला एक सांगू जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हा खरंच तुझ्याकडेच पाहत राहावंस वाटत होत कारण, तुझ ते स्मित हास्य  अन हसताना गालावर पडणारी खळी. मांजरी सारखे इवलेसे दात, अन कृष्णवर्णीय रंगाची तु सावळी. देहाने जणू तु हरणी, मन मोहीत करते मोहिनी. तुला पाहत रहावे वाटते असे, जसे तुझ्यात दिसते मला माझी भावी अर्धांगिनी.©तारंग. खरतर आज तुला आय लव्ह यू बोलू वाटतंय! का? म्हणून याच कारण विचारू नको. कारण, कारण सांगण्या सारख नाहीये पण इतकं सांगेल की मी तुझ्या कृष्णवर्णीय रंगाच्या प्रेमात पडलोय आणि ह...